सुरज यादव यांनी लंपी रोगाबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
दिनांक ३० सप्टेंबर २२
---------------------------------------
सुरज यादव यांनी लंपी रोगाबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
---------------------------------------
सध्या लंपी या रोगाने जनावरांना बाधित करण्याचा धुमाकूळ घातला असून परराज्यांसह महाराष्ट्रात सुद्धा अनेक जनावरे बाधित झाली आहेत .
एकनिष्ठा गौसेवा फाउंडेशनचे संस्थापक सुरज यादव यांनी खामगाव मुख्याधिकाऱ्यांना याबाबत एक पत्र लिहिले असून लंपी आजाराने ग्रस्त गोवंश व जनावरांना वेगळे ठेवून क्वारंटाईन करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे.
खामगाव शहर व तालुका परिसरात लम्पी आजाराने असंख्य गौ वंशाचा मृत्यू झालेला असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर जनावरांनाही हा गंभीर लम्पी आजार झपाट्याने पसरत आहे. त्यामूळे लम्पी आजार झालेल्या गौ वंशाला स्वतंत्र जागा उपलब्ध करून क्वारंटाइन करून त्यांच्यावर योग्य उपचार करावेत जेणे करून लम्पी ग्रस्त असलेले गौ वंशा वर योग्य उपचार होईल अशी सोय करावी व तसेच लम्पी आजार लागण झालेल्या गौ वंशांच्या मालकाला
क्वारंटाइन बाबतीत पत्र देवून अवगत करावे.
या पत्राची योग्य दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल असे म्हंटले आहे.
यावेळी सुरज यादव यांच्यासह , सिद्धेश्वर निर्मळ, ज्ञानेश सेवक, प्रशांत पांडे, सागर उबरकर, पुरुषोत्तम ठोसर, चेतन कदम, सतीश काले, सागर ठोसरे, शुभम ससाने, जितेंद्र गोयल, सागर चव्हाण, विशाल नाटेकर, केतन पांडे, भीमराव गवई उपास्थित होते.
Comments
Post a Comment