जेष्ठ पत्रकार राजेंद्र लकेष्री मुंबई अध्यक्षपदी
पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार राजेंद्र लकेश्री यांची निवड
---------------------------------------
पत्रकार उत्कर्ष समिती या शासन नोंदणीकृत पत्रकार संघटनेच्या मुंबई अध्यक्षपदी येथील धडाडीचे सुप्रसिद्ध जुने जाणते कार्यकर्ते, समाजसेवक, व पत्रलेखक राजेंद्र लकेश्री यांची पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करून राजेंद्र लकेश्री यांना नियुक्तीचे पत्र दिले व शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. अशोक म्हात्रे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका सभागृह माजी नगरसेवक बबन गवस, निवृत्त पोलीस अधिकारी लियाकत सय्यद, शैलेश ठाकूर, ज्ञानेश्वर कोळी, साहित्यिक व पत्रलेखक विलास खानोलकर यांची प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी सत्कारमुर्ती लकेश्री यांनी सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री रामराव आदीक यांच्याबरोबर ३५ वर्षे कार्य केले असुन कामाठीपुरा भागात जवळजवळ ५० वर्षे समाज कार्य केले आहे. १५० वर पुरस्कार व शासनाचे ४ पुरस्कार मिळालेले आहेत. मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष, दत्तगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मुंबई भाडेकरू संघाचे अध्यक्षपद भुषविले आहे. यावेळी समारंभाचे अध्यक्ष डाॅ. अशोक म्हात्रे , माजी नगरसेवक बबन गवस, निवृत्त पोलीस अधिकारी लियाकत सय्यद यांचीही समयसुचक भाषणे झाली.
या अध्यक्ष निवड कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यात शशिकांत सावंत (समाजसेवा /पत्रलेखक), विलास देवळेकर( साहित्यिक /कवी), भाई नार्वेकर ( समाजसेवा), सुरेंद्र तेलंग ( ज्येष्ठ पत्रलेखक ), अनंत दाभोळकर ( ज्येष्ठ पत्रलेखक/ साहित्यिक), सुभाष वाघवणकर (पत्रलेखक/ समाजसेवक) गणेश हिरवे ( समाजसेवक / पत्रलेखक) अशा इतर अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विलास खानोलकर यांच्या दोन पुस्तकांचे
डाॅ. अशोक म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. शेवटी राष्ट्रगीताने
कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment