पेण गडब मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस अनेक घरांमध्ये शिरले पाणी



आवाज कोकणचा : पेण प्रतिनिधी

पेण,गडब  - अरूण चवरकर

आज संध्याकाळी पेण तालुक्यातील गडब परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने गडब ग्रामस्थ भयभीत झाले, कारण दोन तास पाऊस पडताच परिसरातील बहुतांश नाले  भरून वाहू लागले व  सर्व रस्ते जलमय झाले. 

       बघता बघता घरात पाणी शिरून लोकांची पळापळ झाली. अनेकांना आपल्या टु व्हिलर , फोर व्हीलर गाड्या सुरक्षित ठिकाणी नेण्यात पळापळ झाली तर  अनेक प्रकारे नुकसान झाले आहे.

याचे महत्वाचे कारण नाले सफाई करण्यात ग्रामपंचायतीने  कानाडोळा गेले . अनेक वर्षे अरूण चवरकर  यांच्यासह  शेतकरी, ग्रामस्थ यांनी सरपंच, वडखळ पोलिस स्टेशन, पेण प्रांत, कलेक्टर अलिबाग यांना या बाबत  निवेदने दिली तसेच  जॉन्सन गडब कंपनीने वडखळ पोलिस स्टेशन मध्ये अरूण चवरकर यांना लेखी पत्र सुध्दा दिले आहे. परंतु याबाबत ग्रामपंचायतने  वेळेत कारवाई न केल्याने आजची परिस्थिती उद्भवली असल्याचे येथील जनतेचे म्हणणे आहे.











Comments

Popular posts from this blog