कळंबोली मध्ये खाकी वर्दिने आयोजीत केले महारक्तदान शिबीर




 आवाज कोकणचा / सुनील भोईर 

कळंबोली दिनांक ८ ऑक्टोबर 

-----------------------------------------------------------.             .  

             ❗"सद्रक्षाणाय खलनिग्रहणाय" ❗ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या नवी मुंबई विभागातील कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री. संजय पाटील यांनी सामाजिक हित जोपासात महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. 



दोनच दिवसांपूर्वी पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना नवरात्री निमित्ताने जागर आदिमायेचा  सन्मान नारी शक्तीचा सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले होते. त्यावेळी श्री संजय पाटील यांनी या महारक्तदान शिबिराची माहिती दिली होती.

समाजात शांतता नांदावी यासाठी पोलीस नेहमीच तत्पर असतात. पण याही पलीकडे जावून  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कळंबोली पोलीस ठाण्याचे व. पो.नि संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन सुधागड एज्युकेशन हायस्कूल कळंबोली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून शनिवार व रविवार असे दोन दिवस हे शिबीर राबविण्यात येणार  आहे. 

या महाशिबिराचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल भागवत सोनावणे, सुधागड हायस्कूल प्राचार्य राजेंद्र पालवे, डॉ.रुपेश वडगावकर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, विविध संस्थाचे प्रतिनिधी सदस्य यावेळी उपस्थित होते.

कळंबोली हा  विभाग मुंबईचे प्रवेशद्वार असून येथे  अनेक मोठी हॉस्पिटल आहेत. अनेक वेळा एक्स्प्रेस वे वर अपघात झाल्यानंतर येथील रुग्णालयात रुग्णांना आणले जाते. तसेच आजूबाजूचा परिसर झपाट्याने वाढला असून लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे परिणामी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेकवेळा रक्ताचा तुटवडा जाणवतो. 

          या शिबिरासाठी परिसरातील गणेश मंडळ, नवरात्र मंडळ, सामाजिक संस्था, त्याचबरोबर विविध रूग्णालयांचे डॉक्टर्स तसेच कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले आहे.

“जगातील सर्वश्रेष्ठ दान असलेल्या रक्तदानाच्या या यज्ञात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन “मानवते” च्या कार्याचा भाग बनावे. तसेच आगामी   काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता नागरिकांनी, युवकांनी मोठ्या संख्येने या यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी केले तर कळंबोली सह परिसरातील नागरिकांनी या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog