नवी मुंबई पोलिसांचा गुन्हेगारीला आळा.....
आवाज कोकणचा/ नवी मुंबई
प्रतिनिधी दिनंक १० ऑक्टोबर २२
नवी मुंबईतील कुख्यात विकी उर्फ विक्रांत देशमुख साथीदारांसह गजाआड
------------------------------------------------
नवी मुंबई परिसरात खून, अपहरण, बलात्कार, खंडणीसह इतर जवळपास ३८ गुन्ह्यात सहभाग असलेला कुख्यात गुंड विकी उर्फ विक्रांत देशमुख यास नवी मुंबई पोलिसांनी गोवा येथून शिताफीने अटक केल्यानंतर त्याच्या साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी याबद्दल माहिती दिली.
यावेळी उपायुक्त सुरेश मेंगडे, गुन्हे शाखा, स.पो. नि. जी. डी. घने, स.पो. नि. गंगाधर देवडे यांच्यासह विशेष पथकाने मोलाची कामगिरी करून अनेक गुन्ह्यात हवा असलेल्या या टोळीच्या म्होरक्यासह साथीदारांना पकडण्यात यश आल्याने येथील गुन्हेगारी टोळ्यांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment