सिडको निर्मित उलवे नोड मध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव.
आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि/ दिनांक ११ ऑक्टोबर २०२२
---------------------------------------------
आधुनिक शहरात समावेश असलेल्या सिडको निर्मित उलवे नोड येथे अनेक सुविधांचा अभाव ....
---------------------------------------------
जागतिक स्तरावरील आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईचा विकास सिडको महामंडळाने केला आहे. यामध्ये प्रामुख्याने रेल्वेची लोकल सेवा, नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा, लवकरच येऊ घातलेले लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो सेवा, फेरीबोट अशा उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त हे शहर सध्या प्राथमिक सुविधा अभावी चर्चेचा विषय बनला आहे.
येथे उंचच उंच इमारती उभ्या रहात असताना पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेच्या निर्णयाला तिलांजली दिल्याचे दिसते कारण अनेक सेक्टर वसवल्यानंतर कुठेही सार्वजनिक शौचालयाची सुविधा केलेली नाही त्यामुळे घरातून बाहेर पडलेल्या व्यक्तीला येथे या सुविधेपासून वंचित रहावे लागते.
तसेच उलवे नोड मधील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इथे स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजास्तव मृतदेह घेवून नातेवाइकांना नवी मुंबई गाठावी लागते.
विभागातील अनेक हॉटेल्स व दुकानदारांनी फुटपाथवर अतिक्रमण करून शेड उभ्या केल्या आहेत तर फेरीवाले व इतर अनेक दुकाने फुटपाथ सह रस्त्यावर मांडली आहेत तसेच शहराच्या वहाळ येथील मुख्य प्रवेशद्वारापासून अनेक बॅनर व पोस्टर मुळे कदाचित अतिक्रमण विरोधी पथकाच्या नजरेत ते येत नाही म्हणून हे सुंदर शहर बकाल दिसू लागले आहे.
सेक्टर 25 मधील रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्डे रस्त्यात आहेत की रस्ते खड्ड्यात आहेत हे कळत नाही.
यामुळे या सगळ्यामध्ये नक्की कोणाकडे दाद मागावी या विवंचनेत येथील रहिवासी असून सिडको अधिकारी इकडे लक्ष देतील का अशी कुजबूज येथील रहिवासी करत आहेत.
Comments
Post a Comment