रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक पदी श्री सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारला
आवाज कोकणचा / नवी मुंबई
दिनांक १५ ऑक्टोबर २२
------------------------------------------------------------------------------------
रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक पदी श्री. सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती.
भारतीय पोलिस सेवेतील श्री. सोमनाथ घार्गे यांची रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. ते या अगोदर बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी कार्यरत होते.
रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक पदी असलेले श्री. अशोक दुधे यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश निघणार असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. .
श्री. सोमनाथ घार्गे यांनी रायगड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे मावळते पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे यांच्याकडून स्वीकारली.
हसतमुख, शांत,संयमी मात्र कणखर शिस्तीचे, कर्तव्यतत्पर, संवेदनशील, मैत्री भावना जपणारे पोलीस अधीक्षक अशी ओळख निर्माण केलेले माजी पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे व नुकताच कार्यभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!💐🌹
Comments
Post a Comment