आवाज कोकणचा / नवी मुंबई
अशोक म्हात्रे ( १६ ऑक्टोबर २२)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आवाज कोकणचा तर्फे जनजागृती हेतू प्रसारित*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सध्या अनेक ठिकाणी लहान मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याच्या बातम्या येत असतात काही ठिकाणी अनोळखी व्यक्तींना चोर समजून मारहाण किंवा जिवे मारण्याच्या घटना घडल्या आहेत .
अशा संशयित व्यक्ती आढळून आल्यास ताबडतोब जवळच्या पोलिस ठाण्यात याबाबत माहिती देवून सदर व्यक्ती अथवा व्यक्तींना पकडुन पोलिसांच्या ताब्यात द्यावे. स्वतः कुठल्याही प्रकारची मारहाण करू नये.
सनी चव्हाण नामक व्यक्तीचा एक व्हिडिओ नवी मुंबई उलवे न्यूजचे संपादक श्री.आशिष चौधरी यांनी त्यांच्या बातमीपत्रत दाखविला आहे . ज्यामध्ये पारराज्यातील काही लोक लहान मुलांना चोरून नेऊन त्यांची विक्री करत असल्याचा जबाब सदर चोरांनी दिला आहे
सर्वसामान्य जनतेस या द्वारे असे आवाहन करण्यात येत आहे की कृपया आपल्या परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती व त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यास संपर्क करून अशा व्यक्तींची माहिती त्यांना देण्यात यावी
Comments
Post a Comment