मुद्रकांनी एकत्रित राहून समस्यांना निकाली काढलं पाहिजे- बाळासाहेब आंबेकर


अकोला : महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या अंतर्गत अकोला जिल्हा येथे दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकारीणाच्या कोरोना काळानंतर पहिल्या सभेचे आयोजन होटल नैवेद्यम येथे करण्यात आले होते. या सभेच्या आयोजनाचा मान अकोला जिल्हा मुद्रक संघ अकोला यांना मिळाला होता.  सर्वप्रथम शेगांवचे संतगजानन महाराज याच्या प्रतिमेला हारार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व मुद्रण कलेचा शोध लावून ज्यांना सन १४२० मध्ये मुद्रण कला लोकांना समर्पीत केली असे जर्मनीचे जार्ज गुटनबर्ग यांचे प्रतिमेला सुध्दा हारार्पण करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तद्नंतर  उद्घाटन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष तथा जेष्ट पत्रकार श्री बाळासाहेब आंबेकर हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक श्री प्रकाश पोहरे हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे संघटक श्री केशवजी तुपे , संभाजीनगर ,महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे सरचिटणीस  श्री विनय छाजेड , अहमदनगर,  कोषाध्यक्ष  श्री कमलेश धारगडकर, सी ई ओ श्री गांधी, पनवेल मुंंबई, उपाध्यक्ष श्री मनोज बनकर, अहमदनगर, उपाध्यक्ष श्री नंदन खेडेकर देऊळगांव राजा, मुद्रक परिषदेचे श्री नागेश शेंडगे व श्री कल्याणजी भाईकट्टी - सोलापूर, अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष श्री प्रदिप गुरुखुद्दे, तसेच सल्लागार श्री आबारावजी आमले ,श्रीधरजी तिवारी , अकोला हे मंचावर उपस्थित होते.  याच सभेच्या दिवशी दुपारी ३ वाजता अकोला जिल्हा मुद्रक संघाची आमसभा आयोजीत पार पडली. या सभेत सुध्दा वरील पाहुणे मंडळी मंचावर उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अकोला जिल्हा मुद्रक संघाचे उपाध्यक्ष श्री संजय देशमुख यांनी केले.



      या कार्यक्रमात सर्वप्रथम मागील वर्षात तसेच कोरोना काळात जे मुद्रक तसेच पदाधिकारी यांचे निधन झाले त्यांना सामुहीक श्रध्दांजली वाहण्यात आली. नंतर सभेला सुरुवात करण्यात आली. सभेमध्ये विविध सोळा ते सतरा विषयांवर चर्चा करुन या विषयांना मंजूरी देण्यात आली होती. या मंचावरुन मनोगत व्यक्त करतांना मुद्रण व्यवसाय किती अडचणींचा झाला आहे हे प्रकाश पोहरे यांनी त्यांचे भाषेत सांगीतले, विविध प्रकारच्या समस्यांना मुद्रकांना तोंड द्यावे  लागत आहे. विविध प्रकारे २८ टक्के पर्यंत जीएसटी भरुनही जर काही कमाई होत असेल तर त्यातही आय कर चा भरणा करावा लागतो पण जर मुद्रकांचे नुकसान असेल तर मात्र शासन त्या कडे ढुंकुनही पाहत नाही हे मात्र सत्य आहे असेही प्रकाश पोहरे यांनी म्हटले. मुद्रकांच्या समस्या सोडविण्याकरिता मी सदैव तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही सुध्दा दिली.



     अध्यक्ष पदावरुन बोलतांना बाळासाहेब आंबेकर म्हणाले की मुद्रकांनी एकत्रित राहणे ही काहाची गरज असून सर्वांनी एकजूट होऊन भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांना तोंड देण गरजेच आहे. तसेच संभाजी नगर येथून ओलेल मुद्रण परिषदेचे संघटक यांनी सुध्दा मुद्रकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.  अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदिप गुरुखुद्दे यांनी विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले व तु पुढे म्हणाले की वाढत्या महागाईने मुद्रकांचे छापखाने बंद करण्याईतपत वेळ आलेली आहे या परिस्थतीत आपण मुद्रकांनी आपलं उत्पादन खर्च कमी करुन काटकसरीने काम करणे गरजेचे झाले आहे, सोबतच आपआपसात मुद्रकांनी स्पर्धाकरुन दर कमी करुन आपले स्वत:चे नुकसान करुन घेवू नये.



      हा कार्यक्रम होटल नैवेद्यम ,अकोला येथे पार पडला यावेळी संभाजी नगर येथील राहुल घरटे यांनी विशेष करुन मुद्रकांसाठी विविध नविन  टेबल टॉप  तंत्रज्ञान असलेल्या विविध मशिनरी लावून प्रात्यक्षिक दिले. तर होटल नैवेद्यम चे संचालक प्रतिक वानखडे यांनी या कार्यक्रमाकरिता मोफत त्योंचे सभागृह उपलब्ध करुन दिले. प्रतिक वानखडे व राहुल घरटे यांचे महाराष्ट्र मुद्रण परिषदे तर्फे विनय छाजेड यांनी विशेष आभार मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अकोला जिल्हा मुद्रक संघाचे सचिव राजेंद्र देशमुख,कोषाध्यक्ष श्री विद्याधरजी अग्रवाल, कार्यकारी सदस्य दत्ता पाटील ठाकरे, आरिफ खान,संदीप मोरे, शैलेश अहीर, उपाध्यक्ष संजय मा. देशमुख, प्रविण वि. सारभुकन, सहसचिव नंदकिशोर ल. बाहेती , संतोष ग. धरमकर कार्यकारी सदस्य शैलेश क. तिवारी, सुनिल ह. मानधने , श्याम ब. टावरी, सल्लागार समिती चे आबारावजी आमले, संजयजी भालेराव, श्रीधरजी तिवारी आदि मुद्रक बांधव या ठिकाणी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog