आवाज कोकणचा / नवी मुंबई
आशिष चौधरी ( उपाध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई )
२६ ऑक्टोबर
ऐन दिवाळीत भारतीय खाद्य निगम लिमिटेड कळंबोली च्या गोडाऊनला भीषण आग..
भाऊबीजेची सुट्टी असल्यामुळे जीवित हानी नाही
कळंबोली येथील भारतीय खाद्य निगम लिमिटेडच्या गोडाऊनला भीषण आग लागून आत मध्ये असलेल्या 50 किलोच्या तांदूळ बॅगा आधीच्या भक्षस्थानी पडल्या .
आगीचे कारण अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे ही आग एवढी भीषण होती की नवीन पनवेल , खारघर, कळंबोली येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली .
आज भाऊबीज असल्या मुळे येथे कामगार कामावर उपस्थित नव्हते त्यामुळे जीवित हानी झाली नाही आणि आग आटोक्यात आली असली तरी आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
यामागे काही घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून याविषयी पोलीस खाते अधिक तपास करीत आहे.
Comments
Post a Comment