आवाज कोकणचा / नवी मुंबई
१४ ऑक्टो. २२ /
आशिष चौधरी
(उपाध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई )
उपाध्यक्ष
----------------------------------------------
*वर्ल्ड पोस्ट डे निमित्ताने विवीध कार्यक्रमांचे आयोजन*
----------------------------------------------
*९ ऑक्टोबर वर्ल्ड पोस्ट डे"* साजरा केला जातो त्या अंतर्गत 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत *"नॅशनल पोस्ट विक"* साजरा केला जातो.
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी या निमित्ताने दादर पोस्ट ऑफिस ने पोस्ट मास्तर जनरल "श्रीमती स्वाती पांडे" यांच्या अध्यक्षते खाली कोहिनूर पार्क प्रभादेवी येथे कार्यक्रम आयोजित केला होता,मी मानद सचिव म्हणून कार्यरत असलेल्या ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेला खास निमंत्रण दिले होते, माझ्या
लहानपणा पासून पाहिलेले पोस्ट ऑफिस आणि पोस्टमन यांची कामगिरी,याचा माझ्या भाषणात उल्लेख केला त्याच बरोबर सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाति समाज व ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेला दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल आदर भाव व्यक्त केला,
पोस्ट मास्तर जनरल श्रीमती स्वाती पांडे मॅडम यांनी कोरोना काळात पोस्ट ऑफिस मधील स्टाफ ला मी PPE किट चे वाटप केले होते त्याचा आवर्जून उल्लेख केला, मला आपणांस सांगावयास आनंद होत आहे कि, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाति समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मला केलेल्या बहूमोल आर्थिक मदती मुळे मुंबई मध्ये अनेकांना कोरोना काळात PPE किटचे वाटप करणे शक्य झाले होते.
Comments
Post a Comment