आवाज कोकणचा / प्रतिनिधि
नवी मुंबई / दि. ३१ ऑक्टोबर २२
*.........................................................*
न्हावा शिवडी सेतू प्रकल्प बाधित मच्छिमार बांधवांची सभा संपन्न.....
*........................................................*
नवी मुंबईतील न्हावा ते मुंबईतील शिवडी येथे जोडला जाणारा बहुचर्चित सेतू प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आला आहे परंतु या प्रकल्पामुळे बाधित मच्छीमार बांधवांना अद्यापही मोबदला न मिळाल्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
आज गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रकल्प बाधित युवा वर्ग व बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्णय घेतला .
या अगोदर या प्रकल्पातील प्रकल्प बाधित काही लोकांना मोबदला रक्कम एम.एम.आर.डी.ए. ने दिली आहे त्यासाठी शासनाकडून काही निकष लागू केले होते परंतु छोट्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या परंतु शासनाकडे या मासेमारीची नोंद नसलेल्या शेकडो प्रकल्प बाधित जनतेला याचा फायदा मिळाला नाही.
त्यामुळे येथील युवा वर्ग आक्रमक झाला असून लवकरच एम. एम. आर. डी .ए. विरोधात जनआंदोलन उभारून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या सभेसाठी गौरव म्हात्रे, अमित नाईक , अजित म्हात्रे यांच्यासह विभागातील युवक व महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.
Comments
Post a Comment