पेण, आवाज कोकणचा
पेण, अरूण चवरकर
पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हनून काराव गडब ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते पण पाच वर्षे आदिवासी सरपंच आरक्षण नंतर ओ बी सी राखीव महिला आरक्षण आता येणार सर्वसाधारण महिला आरक्षण बातमी समजताच ग्रामस्थांची झोपच उडाली असून लगेच ग्रामस्थ एकवटले आणि विचार विनिमय बैठका चालू झाल्या याच मुळ कारण दहा वर्षांत ग्रामपंचायतीची प्रगती झाली नाही याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला असून, सुशिक्षित,आय, टी, आय, तसेच डिप्लोमा झालेली मुले आज गावात उनाड फिरताना दिसतात. J.S.W. कंपनी मध्ये नोकरी मिळेल या आशेपोटी शिक्षण पूर्ण केले पण आज ही सर्व मुलं सुरक्षीत बेकार झाली आहेत, तेव्हा तरूण वर्ग सुध्दा पेटून उठलेला दिसतोय, तसेच जे एस डब्ल्यू कंपनी च्या सी एस आर फंडाचा फायदा काराव ग्रामपंचायतीच्या पेक्षा इतर ग्रामपंचायतींना झालेला ग्रामस्थ पाहत आहेत, शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, पावसाळ्यात तीन तीन दिवस ग्रामस्थ अंधारात आणि सामाजिक कार्यकर्ते वणवण भटकून गावात रात्रीच दिवस करून लाईट आनतात अनेक मेडिकल क्यांप, झाडे लावा झाडे उपलब्ध करून देखभाल करतात तर या सर्व विचारांची आज चर्चा सरपंच सुरक्षित असावा,तो गावात वास्तव्यास असावा ,कंपनीत नोकरभरती ग्रामपंचायत हद्दीतील करणारा व स्वता निर्णय घेणारा व जे एस डब्ल्यू कंपनी कडून कर स्वरूपात येणारा निधी योग्य ठिकाणी लाऊन गावाची प्रगती करणारा अशा प्रकारे गावात चर्चा चालू झाल्या आहेत
Comments
Post a Comment