पत्रकार उत्कर्ष समितीने केला नवदुर्गा चा गौरव...
*पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे गायिका श्वेता ठाकूर नवदुर्गा सन्मानाने गौरवान्वित.....
---------------------------------------------
पत्रकार उत्कर्ष समिती ही राज्यभरातील पत्रकारांसाठी कार्य करणारी तसेच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून अनेक समाज उपयोगी कार्य करणारी संस्था आहे .
आत्ताच पार पडलेल्या नवरात्री निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींना नवदुर्गा सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर सादर होणाऱ्या सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील आघाडीची गायिका श्वेता सुरेश ठाकूर हिला आज पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष अशोक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका छोटेखानी कार्यक्रमात सन्मानपत्र , पुष्प व पत्रकारितेचे प्रतीक असलेला पेन देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, नवी मुंबई अध्यक्ष निलेश उपाध्याय, नवी मुंबई उलवे न्यूज चे संपादक व पत्रकार उत्कर्ष समितीचे नवनिर्वाचित नवी मुंबई उपाध्यक्ष श्री आशिष चौधरी, रायगड सदस्य सुनील भोईर, सदस्य योगेश पगडे यांच्यासह सुरेश ठाकूर व त्यांची कन्या प्रणाली ठाकूर उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी श्वेता हिस उजवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर श्वेताने सध्या गाजत असलेल्या चंद्रा गाण्याच्या काही ओळी गावून सर्वाँना मंत्रमुग्ध केले.
Comments
Post a Comment