ज्येष्ठ पत्रकार आशिष चौधरी यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई उपाध्यक्षपदी निवड....
ज्येष्ठ पत्रकार आशिष चौधरी यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई उपाध्यक्षपदी निवड.....
---------------------------------------------
पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांसाठी कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थेचे अध्यक्ष अशोक म्हात्रे व नवी मुंबई अध्यक्ष निलेश उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई उपाध्यक्षपदी नवी मुंबई उलवे न्यूज या चॅनेलचे संपादक तथा वरिष्ठ पत्रकार माननीय आशिष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
नवी मुंबई जवळील उलवेनोड झपाट्याने विकसित होत असून येथे अनेक समस्या आहेत .
सिडकोने हे अत्याधुनिक शहर वसवताना भविष्यातील दूरगामी विचार करून अनेक सोयीसुविधांसह निर्माण केले आहे परंतु आज ही येथे अनेक सुविधांची वाणवा आहे .
या सुविधा येथील सामान्य जनतेला मिळाव्यात याकरिता आशिष चौधरी नेहमी प्रयत्नशील असतात.
यावेळी बोलताना श्री चौधरी यांनी पत्रकार उत्कर्ष समितीच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करून पत्रकारितेच्या माध्यमातून येथील जनतेला सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी समितीचे सचिव वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, रायगड जिल्हा सदस्य सुनील भोईर, पनवेल सदस्य योगेश पगडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment