आवाज कोकणचा / अशोक म्हात्रे
पनवेल / दिनांक २१ नोव्हेंबर २२
भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती छत्रपति शिवाजी महाराज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एथे दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी करण्यात आली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आदिवासीना संघटित करून स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान भगवान बिरसा मुंडा यानी दिलंय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुदाम पवार, सहसंयोजक कोकण प्रांत जनजाति सुरक्षा मंच आणि श्री.वैष्णव देशमुख, जिला संयोजक उत्तर रायगड उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र दुबे यांच्या हस्ते मान्यवरांचे आदर सत्कार करण्यात आला. सरस्वती पूजन आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजनने कार्यक्रमाची सुरूवात झाली. भगवान बिरसा मुंडा यांचे ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.
सेंट विलफ्रेड लाँ चे प्राचार्य डॉ. मृत्युंजय पांडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिति लावली होती. यावेळी त्यांच्या भाषणाने चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. झारखंड राज्यात रांचीच्या ऊलीहातू गावात सुगना मुंडा व करमी हातू यांच्यापोटी 15 नवंबर 1875 रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरसा यांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी होती. इंग्रज आपल्या समाजावर अन्याय करीत आहेत, अशी त्याची भावना होती. त्यातून त्यांनी आदिवासी समाजातील लढवय्या युवकांना एकत्र करून इंद्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. 1897 ते 1900 या काळात इंग्रज सैनिक व आदिवासी यांच्यात युद्ध झाले. त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांच्याकडे होते.आदिवासी बिरसा यास धरती बाबा या नावाने ओळखले जात होते. बिरसा मुंडा यांना लोकानी जननायक हा किताब बहाल केला. त्यांच्या स्मरणार्थ रांचीतील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह आणि बिरसा मुंडा विमानतळ आहे. त्यांच्या नावावर अनेक विद्यापीठ,संस्था आणि अनेक इंस्टिट्यूशन स्थापन केल्या आहेत. कार्यक्रमाला अभियंता विभागाचे सर्व विभाग प्रमुख डॉ अंकुश पवार ,डॉ.श्वेता उमाळे,श्रेयस पांडे, मनोज डोंगरे , स्वाती मोरे, अनूप मौयॉ, हरिश्चंद्र मौयॉ, निता गावड़े ,सायली गायकर ,स्वप्निल भोईर, श्रद्धा कावळे व शिक्षकेतर कर्मचारी यानी उपस्थिति लावली होती. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संगणक विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थिनी अक्सा हीने पार पडली.
Comments
Post a Comment