आवाज कोकणचा / रायगड 

पनवेल बातमीदार ता.४ (अशोक घरत) : 

वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या सुमन ताई शांताराम वाघे यांचे आकस्मिक निधन.

..,....,....................................................................... .................



५० वर्षे वय असलेल्या सुमन ताई शांताराम वाघे रा.आंबेमालवाडी कोपरी ता.खालापूर,जि.रायगड यांचे काल अकस्मात निधन होऊन आपल्यातून इहलोकी निघून गेल्या.शरीरयष्टीने बारीक असलेल्या परंतु काटक व कष्टाळू जीवन जगत,आपल्या तीन नातवंड आणि पती सोबत असा संसार सुखाचा सुरू होता.दोन वर्षांपूर्वी पती शांताराम वाघे यांना अर्धांग वायूचा आजार झाला होता. यासाठी पनवेल पटवर्धन रुग्णालय,मुरबाड मधील वैदू,केरळ व कर्नाटक येथील आयुर्वेदिक उपचार पद्धती करून आपल्या पतींना पुन्हा एकदा उभं केलं व खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून त्या सिद्ध झाल्या.*

    *सुमन ताई गेली सतरा वर्षे वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या एकनिष्ठ व समाजाभिमुख कार्यकर्त्या म्हणून कार्यरत राहिल्या.लिहिता वाचता न येणाऱ्या अशिक्षित परंतु उच्चशिक्षित असलेल्या व्यक्तीला सामाजिक कार्यामध्ये मागे टाकतील असे व्यक्तिमत्व त्यांचे होते.कायम धावपळीचे जीवन जगत असायच्या.खालापूर तालुक्यातील किमान २५ ते ३० वाड्यांवर असलेला जिवंत संपर्क याची पोचपावती म्हणून काल त्यांच्या अंत्यविधीसाठी जवळपास सात-आठशे महीला पुरुष उपस्थित होते.*

      *सुमन ताईंनी ऊन वारा पाऊस याची परवा न करता,कशाचीही तमा न बाळगता समाजासाठी केलेल्या प्रत्येक कामाचा क्षण मग तो कोणताही कार्यक्रम असो. सामूहिक विवाह असू दे.समाजात सलोखा व एकोपा ठेवणारा तिळगुळाचा मकर संक्रात,रक्षाबंधनाचा कार्यक्रम किंवा आपल्या हक्कांसाठी हितरक्षेचे कार्य असू दे,या सर्वांसाठी सतत त्या आपलं आद्य कर्तव्य समजून,वेळ काढून मोठ्या आवडीने ते कार्य करत असत.*

      *आपली सून वंदना हिला सुद्धा बाल संस्कार केंद्र सुरू करायला लावून आपल्या मुलांबरोबर वाडीतील मुलांचीही आपली जबाबदारी आहे,ही भावना मनी बाळगून आपल्या मुलीप्रमाणे असलेल्या सुनेमध्ये त्यांनी ती सामाजिक बांधिलकीची भावना रुजवली.*

    *येत्या 15 नोव्हेंबर जनजाती गौरव या दिवसाला नक्कीच रसायनी खालापूर तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सुमन ताईंची कमतरता नक्कीच जाणवेल.*

      *सुमन ताईंनी केलेले कार्य आपल्या सगळ्यांना जनजाती समाजासाठी अधिकाधिक कार्य करण्यासाठी कायम प्रेरणादायी राहील.*

Comments

Popular posts from this blog