आवाज कोकणचा 
उरण प्रतिनिधि / पूजा चव्हाण
फिल्मी स्टाईल मध्ये चोरीचा प्रयत्न करणारे चोरट्यांना उरण पोलिसांनी केले गजाआड.
उरण पोलिसांनी एकदम बहारदार कामगिरी केले. सुतावरून स्वर्ग गाठत थेट वॉन्टेड गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत .दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशी म्हणजेच दीपावलीच्या पहिल्या दिवशीच द्रोणागिरी नोड येथे नामांकित एम गोल्ड ज्वेलर्स मध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता.



 या प्रकरणाचा तपास लावताना वांटेड गुन्हेगार पोलिसांना सापडले आहेत .पोलिसांनी ही सर्व कामगिरी मा. श्री. बिपीनकुमार सिंह सोा, पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. जय जाधव सोा, सह पोलीस आयुक्त, मा.श्री. शिवराज पाटील सोा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल, मा. श्री. धनाजी क्षीरसागर सोा,सहाय्यक पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, व सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि विजय पवार, सपोनि प्रकाश पवार, पोलीस उप निरीक्षक चंद्रहार पाटील नेम. उरण पोलीस ठाणे, सपोनि गळवे, पनवेल तालुका पोलीस ठाणे, सपोनि निकम, न्हावाशेवा पोलीस ठाणे तसेच पोहवा/3518 अधिकारी, पोहवा/967 रूपेश पाटील, पोहवा/2013 घनश्याम पाटील, पोहवा/1744 शशिकांत घरत, पोहवा/1776 कुणाल म्हात्रे, पोहवा/944 नितीन गायकवाड, पोना/1576 मच्छिंद्र कोळी, पोशि/3048 सचिन माळशिकारे यांनी लावला . द्रोणागिरी नोट सेक्टर ५० येथील एन गोल्ड ज्वेलर्स मध्ये एक अज्ञात इसम रिवाल्वर घेऊन जबरी चोरी करण्याच्या इराद्याने घुसला होता , मात्र तेथे काम करणाऱ्या मुलींमुळे तसेच दुकान मालकामुळे त्याचा जो चोरीचा प्रयत्न फसला . सदर घटना दुकान मालकाने उरण पोलिसांना कळविल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आसता सीसीटीव्ही मध्ये चोरटा पळालेले इनोवा कारचा माग मिळाला . या इनोवा कारचा नंबर MH 43 X 7077 असा होता पोलिसांच्या हे निदर्शनास आल्यानंतर गाडीला लावलेला फास्टट्रॅकचा सलग्न मोबाईल नंबर वरून गाडी मालकाची माहिती मिळाली. गाडी मालकाकडे दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी गाडी कोणाला दिली होती , याबाबत विचारणा केल्यानंतर मुंबई साकीनाका येथील इनोवा कारचा चालक अंकुश अश्रूबा जाधव. वय वर्ष 44 याची माहिती मिळाली. चालक अंकुश जाधव याला पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी सानपाडा नवी मुंबई येथून ताब्यात घेतले असता त्याची चौकशी केल्यानंतर वॉन्टेड आरोपी एजाज अब्दुल करीम चौधरी याचा शोध लागला .आरोपी राहणार उल्हासनगर कॅम्प नंबर ४याच्या सांगण्यावरून इनोव्हा गाडी भाड्याने घेण्यात आली होती .त्यानंतर या प्रकारची लिंक लागत गेली व पोलिसांना आरोपी सापडू लागले. एकंदरीत या प्रकरणी तीन आरोपींची गठडी वळण्यात आली. तिसऱ्या आरोपीचे नाव आशिष उर्फ सुरज जिलेंदर सिंग ,असे असून त्याच्यावर मुंबई नवी मुंबई ठाणे या पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण आठ गुन्हे दाखल आहेत .तर दुसरा आरोपी ऐजाज अब्दुल करीम चैधरी याच्यावर मुंबई नवी मुंबई ठाणे तसेच गुजरात येथे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत .या आरोपींनी चोरी प्रकरणी वापरलेली इनोवा कार पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. एकंदरीत ज्वेलर्स मध्ये झालेल्या चोरीच्या प्रयत्नांचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दोन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार उरण पोलिसांच्या हाती सापडलेले आहेत . 

Comments

Popular posts from this blog