आवाज कोकणचा / प्रतिनीधी
पुजा चव्हाण / उरण दि.११ नोव्हेबर २२
--------------------------------------------------------------------
मनसेने पी. एस .ए .पोर्ट समोर केले गेट बंद आंदोलन.
दिनांक १०नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पीएसए पोटच्या गेट समोर गेट बंद आंदोलन करण्यात आले होते यामध्ये उरण तालुक्यातील स्थानिक व प्रकल्पग्रस्त यांना जेएनपीटीचे चौथे पोर्ट म्हणजेच पीएसआय मध्ये नोकऱ्या मिळाव्यात तसेच स्थानिक कोळ्यांना न्याय मिळावा. यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गेट्स बंद आंदोलन केले उरण तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी या प्रकल्पांना गेल्यामुळे व तसेच समुद्रात भराव केल्यामुळे मच्छी बांधवांचा रोजगार बंद झालेला आहे व त्यामुळे येणारे पिढीला बेरोजगारी भासू लागली आहे .त्यामुळे यांना रोजगार उपलब्ध व्हावा व त्यांच्या न्याय हक्कासाठी मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पीएसए पोटच्या समोर आंदोलन केले .यावेळी तीन तास गेट समोर चक्काजाम झाला होता यावेळी मनसेचे नेते तथा पालघर व ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ,आणि मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर , मनसे नाविक सेनेचे जिल्हा सचिव अविनाश पडवळ,अतुल चव्हाण, उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी, पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, तालुका सचिव अल्पेश कडू, विधानसभा सचिव विजय तांडेल,उपतालुकाध्यक्ष राकेश भोईर, मंगेश वाजेकर,विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर, बबन ठाकूर, अनिल गावंड, सोमनाथ घरत, निशाण ठाकूर, दीपक सुतार,आतिश पाटील,अभय पाटील, वृषभ म्हात्रे, नरेंद्र पाटील, अंकुश तांडेल, नरेंद्र मोकल, आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी पालघर व ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलेल्या निवेदना चा विचार करून आम्हा चार दिवसात बैठकीस नाही बोलवले, तर आम्ही आता सांगून यापुढे आम्ही न सांगता आम्ही आंदोलन करू असे खडसावून सांगितले.
Comments
Post a Comment