आवाज कोकणचा / एकनाथ सांगळे

दिनांक १३ नोव्हेंबर २२           

-------------------------------------------------        

जे.एस.एस.रायगड चे संचालक श्री विजय कोकणे "साउथवेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी-(यू.एस.ए विद्यापीठाच्या) "मानद डॉक्टरेट पदवी" ने सन्मानित



भारतीय वारली हस्तकला कलाकृती निर्मिती व संशोधनासाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान



 अँड्रयू टेलर व जॉन पीटर ऑस्बोर्न ह्या "साउथवेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी-यू.एस.ए (विद्यापीठ") प्रतिनिधींच्या हस्ते डॉ विजय हिरामण कोकणे संचालक- जन शिक्षण संस्था रायगड-महाराष्ट्र ह्यांना "साउथवेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी-यू.एस.ए (विद्यापीठ)" यांच्या वतीने ''डॉक्टरेट इन फाइन आर्ट"- (DFA)" ह्या अंतरराष्ट्रीय स्तरावरील'' मानद डॉक्टरेट पदवीने'' सन्मानित करण्यात आले. सिल्व्हर-प्लेटेड मेडल आणि फ्रेम केलेले ''मानद डॉक्टरेट पदवी'' प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. 



यापूर्वी देखील डॉ विजय हिरामण कोकणे यांना विश्व मानवाधिकार ट्रस्ट-स्पेशल स्टेटस युनायटेड नेशन- डिपार्टमेंट ऑफ इकॉनोमिक अँड सोशल अफेयर्स यांच्या माध्यमातून देश सेवेतील महत्त्वपूर्ण कार्य व योगदानाबद्दल " डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी-सोशल वर्क " या राष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरेट मानद पदवीने सन्मानित करण्यात आलेले होते


 ''वारली चित्रकला हस्त कला कौशल्य प्रशिक्षण आणि रायगड जिल्ह्यातील लोकांचा सहभाग'' ह्या विषयवार अभ्यास व संशोधन ,कौशल्य प्रशिक्षण,आणि सदर विषयांतील सामाजिक उपक्रमांसाठी उत्कृष्ट कामाबरोबरच "हस्तकलेच्या" वारली चित्रकलेतील 1500 पेक्षा अधिक नावीन्य पूर्ण नैसर्गिक भव्य कलाकृती निर्मिती ह्या त्यांच्या संशोधन कार्याची विशेष दखल साउथवेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी-यूएसए यांनी घेतली. डॉ नितीन गांधी प्रकाशित व डॉ विजय हिरामण कोकणे निर्मित "वारली चित्रकलेवर आधारित संशोधन पुस्तिकेचे" विशेष कौतुक आयोजनांकडून करण्यात आले. "ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन च्या माध्यमातून दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी भारतातील पंचतारांकित हॉटेल कॉलिटी इन शबरी ग्रँड-, चेन्नई -तामिळनाडू ह्या ठिकाणी रेड कार्पेट दीक्षांत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ नितीन गांधी जी (अध्यक्ष), श्री हिरामण कोकणे, सौ आशा कोकणे ,सौ सुमन कोकणे हे प्रतिनिधी प्रत्यक्ष कार्यक्रमात उयपस्थित होते, 

 सदर प्रावीण्याबद्दल डॉ मेधा सोमैय्या जी (संस्थापक अध्यक्षा), डॉ नितीन गांधी जी (अध्यक्ष), सौ गीतांजली ओक (उपाध्यक्ष), श्री हिरामण कोकणे, सौ आशा कोकणे ,सौ सुमन कोकणे , प्रा अविनाश ओक, श्री नरेन जाधव जी, अॅड नीला तुळपुळे , सौ स्वाती मोहिते, सौ रत्नप्रभा बेल्हेकर,सौ मानसी वैशंपायन श्री भगवान नाईक, श्री रोनित गांधी सर्व बोर्ड मेंबर व कर्मचारी वृंद ,समस्थ कोकणे ,राणा ,वाणी, मोरे ,टिळे ,गुळवे .शिंदे आणि JSS परिवार ह्यांनी श्री विजय हिरामण कोकणे ह्यांना शुभेच्छा दिल्या.

 सदर कार्यक्रमात माननीय न्यायमूर्ती के. स्वामीदुराई- ( न्यायाधीश, उच्च न्यायालय मद्रास माजी सदस्य, कायदा आयोग तामिळनाडू माजी सदस्य, राज्य मानवाधिकार आयोग तमिळनाडू), माननीय के. वेंकटेनन- (माजी दिवाणी न्यायाधीश, मद्रास, तामिळनाडू),माननीय जे. हातिडोस-*(माजी जिल्हा न्यायाधीश, मद्रास, तामिळनाडू), डॉ. एस.एस.आर. रामदास-*(माजी खासदार लोक सभा चेन्नई येथे नवी दिल्ली). स.साधशिवम - (आमदार, मेत्तूर, सालेम) इत्यादी मान्यवर यांबरोबरच मोठ्या प्रमाणावर सिने अभिनेते व डायरेक्टर्स उपस्थित होते श्री. आर. सेल्वम-(अध्यक्ष, ग्लोबल अचिव्हर्स लॉ कमिशन) यांच्या अध्यक्षते खाली सदर उपक्रम पार पडला.


डॉ विजय हिरामण कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल डॉ किरीट सोमैय्या जी (अध्यक्ष-पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई), डॉ मेधा सोमैय्या जी (संस्थापक अध्यक्षा),डॉ रामकृष्ण सुरा जी (अतिरिक्त संचालक- डि.जे.एस.एस.भारत सरकार) डॉ नितीन गांधी जी (अध्यक्ष), सौ विद्या गांधी,सौ गीतांजली ओक (उपाध्यक्ष) प्रा अविनाश ओक, श्री नरेन जाधव जी, अॅड नीला तुळपुळे , सौ स्वाती मोहिते, सौ रत्नप्रभा बेल्हेकर,सौ मानसी वैशंपायन श्री भगवान नाईक (सर्व बोर्ड मेंबर), त्यांचे श्री हिरामण कोकणे, सौ आशा कोकणे ,सौ सुमन कोकणे व समस्थ कोकणे ,राणा ,वाणी, मोरे ,टिळे ,गुळवे .शिंदे आणि JSS परिवार यांचे विशेष आभार मानले. तसेच त्यांनी JSS रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व विविध क्षेत्रांमध्ये मागील 8 वर्षांपासून ,6 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल व आता 1 वेळा अंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. व आभार मानले





Comments

Popular posts from this blog