शिवकालीन मर्दानी खेळांना राजमान्यता मिळूवून नवीन पिढीपर्यंत पोचविण्यासाठी मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया प्रयत्नशिल , कामोठे येथे खेळांच्या प्रात्यक्षिकासह देशभरात सुरुवात....iii
आवाज कोकणचा / प्रतिनिधि
पनवेल दिनांक २० नोव्हेंबर २२
-----------------------------------------------------
शिवकालीन मर्दानी खेळांना राजमान्यता मिळूवून नवीन पिढीपर्यंत पोचविण्यासाठी मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया प्रयत्नशिल , कामोठे येथे खेळांच्या प्रात्यक्षिकासह देशभरात सुरुवात....iii
---------------------------------------------------
छत्रपती युवराज संभाजी राजे भोसले अध्यक्ष असलेल्या वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन अंतर्गत मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे शिवकालीन खेळ नवीन पिढीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून या पिढीला मोबाईल ऐवजी खेळात निपुण करण्यासाठी युवराज संभाजी राजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने हे शिवकालीन खेळ देशभरातील शाळांमध्ये पोहोचविण्यासाठी कंबर कसली आहे.
मर्दानी स्पोर्टस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रशांत मोहिते व सचिव विनोद कुंजीर यांनी राष्ट्रीय सचिव संतोष खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्याने नवी मुंबईतील कामोठे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप कुमार सिंग , तामिळनाडू प्रभारी जे कमलेश्वर , युपी प्रभारी दिलीप कुमार, हिमाचल प्रदेश अनिल कुमार सिंग, दादरा नगर हवेली हर्षद मार्गे, पंजाब परविंदर सिंग , आंध्र प्रदेश मोहम्मद कासिम , गुजरात दिव्यांग परमार, राजस्थान प्रसाद सिंग, कर्नाटक अल्ताफ मुल्ला, दिल्ली जगदीश प्रसाद, बिहार भोला कुमार थापा, तेलंगाना वजाहअली खान, पुडूचेरी आर. ज्ञानसेगरण यांच्यासह पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, नवी मुंबईतील नामवंत कराटे प्रशिक्षक शैलेश ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .
सध्या मोबाईलच्या वाढत्या अतिरेकामुळे लहान वयातच मोबाईलच्या अधीन झालेले विद्यार्थी पाहायला मिळत आहेत याचा दुष्परिणाम दिसून येत असून विद्यार्थी खेळांपासून दूर गेल्याने त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे दिसून येते आहे.
यातून सुटका करण्यासाठी व भविष्यातील विद्यार्थी सुजाण, सशक्त आणि क्रीडा क्षेत्रात निपुण होऊन सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी आपल्या मातीतील शिवरायांच्या काळातील हे खेळ देशासह जगभरात पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून या खेळांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक नवी मुंबईत दाखविण्यात आले.
तसेच हे खेळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करून सुदृढ भारत घडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने केली यावेळी नृत्य तारांगणा मनश्री कदम हिने भक्तीगीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर आपल्या मातीचा खेळ लेझिम गटाच्या मंजुषा कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी लेझिम सादर करून मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर अंकुश गडांकुश यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवकालीन विविध खेळांची प्रात्यक्षिके करून दाखवली.
लवकरच हे खेळ भारतभर शाळांमध्ये येतील व सुदृढ आणि निकोप भारत बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरतील असा विश्वास राष्ट्रीय सचिव संतोष खंदारे यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment