श्रद्धा हत्याकांडातील महत्त्वाची गुपितं उलगडणार!


 आवाज कोकणचा / (जितीन शेट्टी)

श्रद्धा हत्याकांडातील महत्त्वाची गुपितं उलगडणार! आफताबची आज होणार नार्को टेस्ट, 'हे' प्रश्न विचारण्याची शक्यता

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी :- आज मोठे खुलासे होऊ शकतात. आज आरोपी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी (18 नोव्हेंबर) दिल्लीतील कोर्टाने या संदर्भात निर्देश दिले होते. नार्को टेस्टमध्ये आफताब अमीन पूनावाला याला 50 हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. यादरम्यान आफताब, त्याचे करिअर आणि श्रद्धा याविषयी प्रश्न विचारले जातील. आफताबने श्रद्धा वालकरला का मारले हे लवकरच कळणार आहे. तिच्या शरीराचे तुकडे कुठे फेकले गेले? हत्या का केली? आफताब ड्रग्ज घेतो का? याशिवाय आफताबकडून अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे खुनाशी संबंधित प्रकरणात सामान्यतः नार्को चाचणी केली जाते, ज्याच्या मदतीने अत्यंत हाय प्रोफाइल किंवा गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासात मदत होते. श्रद्धा हत्याकांडातही दिल्ली पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर त्याच्या माध्यमातून तपासाला वेग येऊ शकतो. 


श्रद्धा आणि आफताबचे नाते कसे होते? 

सुत्रांच्या माहितीनुसार, नार्को टेस्टमध्ये श्रद्धा आणि आरोपी आफताबसोबतच्या तिच्या नात्याबाबत प्रश्न विचारले जाणार आहेत. दरम्यान, ही हत्या अचानकपणे करण्यात आली की? पूर्ण नियोजन करून? हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, आफताब श्रद्धाला कसा आणि कधी भेटला? त्याने श्रद्धाची हत्या कशी केली? मृतदेहाच्या तुकड्यांबाबत, शस्त्रे आणि मोबाईल कुठे फेकले? हे प्रश्न नार्को टेस्टमध्येही विचाण्यात येणार असल्याची शक्यता आहे.नार्को चाचणीनंतर 22 रोजी न्यायालयात हजेरी

न्यायालयाच्या आदेशानुसार, फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये आफताबची नार्को चाचणी झाल्यानंतर त्याला 22 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान पोलीस तपासासाठी आणखी वेळ मागू शकतात, तसेच त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची विनंतीही कोर्टाला करू शकतात. 

पोलिसांना अजून काय सापडले नाही?

श्रद्धाचे शीर

खुनाचे शस्त्र

रक्ताने माखलेले कपडे

कोणताही प्रत्यक्षदर्शी

घटनेचे कोणतेही व्हिडीओ फुटेज


पोलिसांना आतापर्यंत काय सापडले?

श्रद्धाच्या मृतदेहाचे काही अवशेष आणि हाडे

रेफ्रिजरेटर

श्रद्धा आणि आफताबचे काही कपडे 



नार्को टेस्ट का केली जाते?

नार्को चाचणी ही एखाद्या हायप्रोफाईल गुन्ह्याच्या तपासात पुराव्याच्या शोधासाठी आरोपीची चौकशी केली जाते. या चाचणी दरम्यान, एक इंजेक्शन आरोपी व्यक्तीला दिले जाते. यानंतर व्यक्ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पोहोचते. अशा परिस्थितीत प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे जाते.

Comments

Popular posts from this blog