आवाज कोकणचा / पूजा चव्हाण
उरण दिनांक २१ नोव्हेंबर २२
बोकडवीरा गावात मतदार यादी घोटाळा .
उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये मतदार यादीतील नावे फिरवण्याचा धक्का दायक प्रकार उघडकीस झाल्याचे दिसून आले आहे.मतदार यादित मोठा घोटाळा झाल्याचे तेथील नवतरुण आवेश लीलाधर ठाकूर यांनी उघड केले आहे.
उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये मतदार यादीतील नावे फिरवण्याचा धक्का दायक प्रकार उघडकीस झाल्याचे दिसून आले आहे.मतदार यादित मोठा घोटाळा झाल्याचे तेथील नवतरुण आवेश लीलाधर ठाकूर यांनी उघड केले आहे.
प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांची नावे त्यांच्या संमती शिवाय प्रभाग क्रमांक एक मध्ये टाकण्यात आल्याचा धक्का दायक प्रकार उघडकीसआला आहे. या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडालेली आहे.हा सर्व प्रताप खोटे अर्ज करून श्री रुपेंद्र चंद्रकांत ठाकूर यांनी केल्याचा आरोप नवतरुण आवेश ठाकूर यांनी आवाज कोकणचा सोबत बोलताना केलंय.
आवेश ठाकुर यांच्या म्हणण्याप्रमाणे बोकडविरा ग्रामपंचायतच्या मतदार यादीत त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची नावे प्रभाग क्रमांक दोन मध्ये होती परंतु श्री रुपेंद्र चंद्रकांत ठाकूर यांनी चुकीच्या पद्धतीने हरकत घेऊन नवतरुण आवेश ठाकूर यांच्याशी संबंधित कुटुंबांची नावे प्रभाग क्रमांक एक मध्ये टाकली ही नावे टाकताना आपल्याला तसेच आपल्या सर्व कुटुंबीयांना विश्वासात न घेतल्याचा आरोप नवतरुण आवेश ठाकूर यांचा आहे.
नवतरुण आवेश ठाकूर यांनी याप्रकरणी ग्रामसेविका, सौ. अनिता म्हात्रे, यांच्या सही शिक्का असलेले पत्रक तहसीलदार यांचा कडे पाठविले त्या नुसार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ते मंजूर केले आहे. सदर प्रकरणी चुकीची स्थळ पानी अहवाल देऊन या प्रकरणातील दोशिवर शासनाने योग्य ती कारवाई मतदार निवडणूक अधिकारी यांनी करावी अशी कळकळीची विनंती नवतरुण आवेश ठाकूर यांनी केली आहे.या प्रकरणी नवतरुण आवेश ठाकूर यांनी मा. तहसीलदार,उरण पोलीस ठाणे,ग्रामपंचायत,यांच्याकडे तक्रारी अर्ज सुध्दा केला आहे तसेच राज्य निवडणूक आयोगावाकडे याची सखोलचौकशीची मागणी केली आहे .
Comments
Post a Comment