आवाज कोकणचा / प्रतीनिधी
उरण / पूजा चव्हाण
पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नामकरणाबाबत छावा क्रांतिवीर सेनेच्या मागणीला यश
पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे . गेले काही महिने छावा क्रांतिवीर सेनेची पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला डॉ.नानासाहेब धर्माधिकारी नाव द्या, या नामकरणा बाबत मागणी होती. गेली अनेक दशकापासून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्फत समर्थ रामदासांच्या दासबोधाचे सोप्या निरुपणातून सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला संस्कारी दिशा देण्याचे काम महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी व त्यांचे पाश्चात आप्पासाहेब धर्माधिकारी सचिन धर्माधिकारी व कुटुंबीयांच्या माध्यमातून यशस्वीरित्या करत आहेत . त्यांच्या कार्याचा जगभर गौरव आणि आदर्श आहे. त्या अनुषंगाने पनवेल येथे नव्याने झालेले उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी नामकरण करण्यास शासनाकडून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली होती . व तसा शासन निर्णय 16 सप्टेंबर 2019 रोजी जारी करण्यात आला ,परंतु गेली तीन वर्ष प्रशासनांकडून त्याचे अमलबजावणी केली गेली नाही . त्यामुळे छावा क्रांतीवीर सेना रायगड जिल्हा अध्यक्ष रोशन दादा पवार, उपजिल्हा अध्यक्ष जितेंद्र ठाकूर ,संपर्कप्रमुख स्वप्निल घरत , कोन विभाग प्रमुख अनंत कोंडिलकर, पनवेल तालुका अध्यक्ष अशोक घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष विशाल देशमुख, आदित्य वाघ. यांनी,छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून या उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरात लवकर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी नामकरण याची मागणी केली होती ,निवेदनाद्वारे उपजिल्हा रुग्णालयाचे तहसीलदार महानगरपालिका जिल्हा वैद्यकीय अधिकारी अलिबाग या कार्यालयांना देऊन यावर तातडीने अंमलबजावणी झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला गेला होता.त्याचबरोबर दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रायगड चे पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या जनता दरबार सुद्धा याबाबत छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले रुग्णालयाचे प्रशासनाने त्यावर तातडीने अंमलबजावणी करून नव्याने पनवेल मध्ये नवीन झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी असे नामकरण करण्यात आले. यामुळे सर्वनी प्रशासनाचे आभार मानले जात आहे . तसेच या नामकरण बाबत पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा करणारे छावा क्रांतिवीर सेनेच्या सर्व सदस्यांची देखील आभार मानले जात आहेत.
Comments
Post a Comment