आवाज कोकणचा / पूजा चव्हण

पमवेल प्रतिनिधि

----------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर तर्फे जोडेमार आंदोलन.



स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह  विधान केल्याबद्दल राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी पनवेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर तर्फे जोडेमार आंदोलन करण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अतुलनीय योगदान आहे. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हे फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. फक्त त्यांनीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनी देखील देशासाठी केलेले बलिदान हे सर्वोच्च आहे , त्यामुळे भारत जोडो यात्रा ही भारताला जोडण्यासाठी नसून सदर यात्रेतून आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिका विरुद्ध अक्षय पार्य टिपणी आणि टीका करून समाजात फूट पाडण्याचे कारस्थान राहुल गांधी यांनी आरंभलेले आहे. त्यामुळे भारत जोडे यात्रेला कोणत्याही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर सावरकरांचे नाव घेऊन उथळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न हा अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. हिंदुत्ववादी देशभक्त जनता हे कधीच मान्य करणार नाही. असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर तर्फे जोडेमार आंदोलन करण्यात आले होते . यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा सचिव अतुल चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष अनिमेश ओझे,विधानसभा सचिव प्रतीक वैद्य,पनवेल महानगर सचिव पराग बालाड, उपशहर अध्यक्ष संजय मुरकुटे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव अक्षय जोशी,तालुका सचिव आकाश गाडे, पनवेल महानगर अध्यक्ष अनिकेत मोहिते,नवीन पनवेल उपशहर अध्यक्ष मंदार गोसावी,वाहतूक सेनेचे चिटणीस सचिन जाधव, महाराष्ट्र सैनिक सचिन सिलकर, प्रथमेश सोमण,केदार सोमण,संचित मोरे, अवधूत ठाकूर, स्नेहल राजमाने,आदी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog