आवाज कोकणचा / जितिन शेट्टी
पनवेल / प्रतिनिधी
हॉटेल वेल्वेट चालते लेट, उत्पादन शुक्ल खाते सायलेंट
कोन येथील लेडीज बारच्या हाकेवर असलेला कोळखे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल वेल्वेट ट्रीट पहाटे चार पर्यंत सुरु असून या ठिकाणी हुक्क्याच्या धूरासहीत रात्रभर मद्यविक्री होत असल्याने उत्पादन खाते मात्र सायलेंट मोडवर आहे. लेडीज सर्व्हिस बार लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार बंद झाल्यावर अनेक बारबाला आपल्या पंटर सोबत या ठिकाणी मद्य प्रश्न करण्यास आणि हुक्का ओढण्यासाठी येतात. यातून अनेकवे ळा वाद होऊन हवेत गोळीबारझाल्याचा घटना घडल्या आहेत.
पनवेल महानगर पालिका क्षेत्र असो किंवा मुंबई गोवा महामार्ग असो सगळेच हॉटेल , बार हे शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदत वेळेत बंद केले जातात , मात्र जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर कोळखे ग्रामपंचायत हद्दीत असलेले हॉटेल वेलवेट ट्रीट , पहाटे चार वाजेपर्यंत सुरु असल्याने या हॉटेल ला कोणत्या प्रशासनाने पहाटे चार पर्यंत हॉटेल सुरु ठेवण्याचा परवाना , मद्य विक्री परवाना , हुक्का परवाना कुणी दिला आहे असा सवाल कोळखे ग्रामस्थ करीत आहेत .
Comments
Post a Comment