आवाज कोकणचा / प्रतीनिधी
पनवेल  दिनांक 13 डिसेंबर 22
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

            ॲडव्होकेट दिव्या लोकरे पत्रकार उत्कर्ष समिती कडून सन्मानित....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




पत्रकार उत्कर्ष समिती हि पत्रकारिते सोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येत असते.
                   पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र सचिव ॲड. दिव्या लोकरे यांनी कठीण परिस्थितीतून पुढे येत सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉ मधून वकिली परीक्षा पास केली आहे.  त्यासाठी या कॉलेज चे प्राचार्य व समितीचे कायदेविषयक सल्लगार डॉ. मृत्युंजय कुमार पांडे, समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे,  प्राध्यापक ललित यांच्या शुभ हस्ते व पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र सचिव डॉ. वैभव पाटील, उपाध्यक्षा आरती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. दिव्या लोकरे यांना आज सन्मानित करण्यात आले. 



यावेळी बोलताना डॉ. पांडे यांनी समितीच्या कार्याचा गौरव करतानाच अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना हुरूप येऊन ते अधिक जोमाने  आपले शैक्षणीक जीवन पूर्ण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होतात असे सांगितले. 

Comments

Popular posts from this blog