आवाज कोकणचा  / (विठ्ठल ममताबादे )

उरण दिनांक 17 डिसेंबर 22
 

उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज : आज मतदान.


61 मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य रवाना  


उरण तालुक्यात रविवार दि.18 डिसेंबर 2022 रोजी होत असलेल्या 17 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यांच्या मतदानासाठी पोलिस बंदोबस्तात ठिकठिकाणी रवाना करण्यात आले असल्याची माहिती उरणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी 61 मतदान केंद्र आहेत.या 61 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पाडण्यासाठी 366 कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 शनिवारी 17 डिसेंबर 2022 रोजी उरण तालुक्यातील पाणजे,डोंगरी,नवीनशेवा,बोकडविरा,भेंडखळ, नवघर, पागोटे, जसखार, करळ, धुतुम, चिर्ले, रानसई,

कळंबुसरे,पिरकोन, सारडे, वशेणी व पुनाडे आदी 17 ग्रामपंचायतीमध्ये मतदान यंत्रासह मतदान साहित्य पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आलेअसून,कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून, उरण तालुक्यातील या 17 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.


Comments

Popular posts from this blog