आवाज कोकणचा / जितीन शेट्टी
पत्रकार सुनिल शांताराम ठाकुर राज्य स्तरीय महात्मा फुले समज भूषण पुरस्कार 2022 ने सन्मानित
पनवेल (जितीन शेट्टी ).उरण तालुक्यातील दिघोडे सारख्या ग्रामीण भागातून गेली 22 वर्ष पत्रकारीता बरोबर सामाजिक कार्य करत असतात .या त्यांच्या पत्रकारितेची व कार्या ची दाखल घेत ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड नवी मुंबई तर्फे नुकताच त्यांना प्रभादेवी येथील पू.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे टीव्ही अभिनेते जयंत ओक. व अभिनेत्री दीप्ती भागवत यांच्या हस्ते राज्य स्तरीय महात्मा फुले समाज भूषण 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी शास्त्रज्ञ् अमजेद् खान ,समाज सेविका अनुल अत्तर ,ग्लोबल गोल्ड टॅलेंट नवी मुंबई अध्यक्षा मेघा श्रीराम महाजन ,उपाध्यक्ष श्रीराम महाजन ,,सदस्य आदी सह विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते उपस्थित होते .
कार्यक्रमाचे शानदार निवेदन व आभार अनघा जाधव यांनी केले .
Comments
Post a Comment