पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे लोधीवली येथे आरोग्य शिबीर संपन्न

 

 पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे लोधीवली येथे आरोग्य शिबीर संपन्न

प्रतिनिधि/एकनाथ सांगळे

    


  पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र व श्रीपाद हॉस्पिटल मोहोपड  यांच्या संयुक्त विद्यमाने लोधीवली येथे  आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


 शिबिराचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नागरिक श्री चंद्रकांत भुईकोट, श्री किसन सांगळे, श्री हरी कदम, श्री काशिनाथ भुईकोट तसेच नवीन ग्राम पंचायत लोधीवलीचे सदस्य कु. निखिल पाटील,  सौ सुशीला भुईकोट उपस्थित होते. या वेळी विविध तपासण्या म्हणजे बीपी, ईसीजी, शुगर इत्यादी व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. 



हॉस्पिटलचे  प्रमूख डॉ.  संजय म्हात्रे, डायरेक्टर  राजेश म्हात्रे, जयदास जाधव उपस्थित होते.  डॉ. जावेद, जयश्री मैत्री, तनुजा उतेकर, सारिका परब, सेजल परब, श्वेता त्रिपाठी व कडू मावशी उपस्थित होत्या. गावातील नवतरुण धनाजी भुईकोट, संजय सांगळे, यशवंत पाटील, भगवान पारठे, अनिल पाटील तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. या आरोग्य शिबिराचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घेतला. शिबिराच्या आयोजनासाठी तनुजा उतेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Comments

Popular Posts