कुडाळ दिनांक ४ डिसेंबर २२
जागतिक एड्स दिनानिमित्त बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळच्या वतीने कुडाळ मध्ये जनजागृती फेरी काढून व पथनाट्य सादर करण्यात आले.
अजूनही समाजामध्ये एडस् या आजाराविषयी भीती, संकुचित मानसिकता आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे आजाराविषयी असणारे अज्ञान. या आजाराचा प्रसार नक्की कुठल्या मार्गाने होतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही अनैतिक लैंगिक संबंध हा एक च मार्ग या आजाराचा प्रसार मार्ग आहे असा समाजामध्ये गैरसमज आहे परंतु फक्त आजार पसरायचा हा एकच मार्ग नसून एड्स आजाराने बाधित असणाऱ्या व्यक्तीने रक्तदान केल्यास तसेच एका पेक्षा जास्त रुग्णांना एकाच सुईचा वापर करणे , अमली पदार्थ एकाच इंजेक्शन द्वारे अनेकांनी टोचून घेणे किंवा एक संक्रमित गर्भवती महिलेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला देखील काही प्रमाणात आजार होऊ शकतो असे अनेक मार्ग आहेत .
यासाठी समाजामध्ये जनजागृति करणे गरजेचे आहे म्हणून या दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळच्या वतीने कुडाळ शहरात , बाजारपेठेत जनजागृती फेरीचे आयोजित केले होते.
या रॅलीमध्ये बीएससी नर्सिंग द्वितीय वर्ष व जीएनएम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता.
बी.एस.सी. द्वितीय वर्ष विद्यार्थिनी जयश्री चव्हाण , प्राध्यापिका वैजंती नार, प्राध्यापक ऋग्वेदा राऊळ यांनी या पथानाट्याची सुरेख भाषेत मांडणी केली होती.
या आजारासंबंधी संदेश देणाऱ्या घोषणा देत आंबेडकर नगर कुडाळ ते संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ या मार्गावर या जनजागृती फेरीने मार्गक्रमण करत समाजात जनजागृती केली.
या जनजागृती फेरी दरम्यान विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कुडाळ बस स्टॅन्ड समोर पथनाट्य सादर केले . या जनजागृती फेरीला प्राचार्य कल्पना भंडारी , प्राध्यापक प्रथमेश हडमरकर , प्राध्यापक प्रणाली माढेकर, प्राध्यापक पूजा मालाडकर , प्राध्यापक प्रियंका माळकर , प्राध्यापक नेहा महाले, प्राध्यापक गौतमी माहेनकर तसेच प्रसाद कानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या पथानाट्यामध्ये प्रांजल सावंत , प्रयाली बिघवणकर, विशाल आढळकर , तेजस दळवी , दिव्या सावंत , सहदेव पोपकर , हनुमान काकडे , अर्पिता मोरे, सिद्धेश चव्हाण, मानसी आलोरकर हर्षल सावंत, वसुंधरा जोशी ,पास्किन सोज, भारती गोसावी, सायली परब ,साक्षी नागोळकर, वसंत गावडे, स्वप्निल जगदाळे ,सिद्धेश भांडे, भक्ती धाकोळकर ,गायत्री रेड्डी ,शिवानी वारंग. अनिकेत पवार, अनुष्का नाईक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
Comments
Post a Comment