आवाज कोकणचा / प्रतिनीधी
सत्याची वाटचाल वृत्तपत्राची दिनदर्शिका अक्कलकोट येथे श्री स्वामी चरणी लोकार्पित...
पत्रकार उत्कर्ष समितीचे सदस्य सत्याची वाटचालचे संपादक श्री गोविंद धर्मा जोशी यांनी तयार केलेली दिनदर्शिका अक्कलकोट येथे श्री स्वामी चरणी ठेवून लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अक्कलकोट मंदिर परिसरात अनेक भाविकांनी ही दिनदर्शिका घेऊन संपादक गोविंद धर्मा जोशी यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , रायगड जिल्हा सदस्य श्री सुनील लहू भोईर उपस्थित होते.
समीतिचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी ही दिनदर्शिका परिपूर्ण असून यामध्ये वेगवेगळे सण , उत्सव , जत्रा यासह तिथी, वार, नक्षत्र व पंचांग यांचा समावेश आहे. अतिशय सुबक मांडणी व पुरेपूर माहिती असलेली ही दिनदर्शिका वाचकांसह प्रत्येक घरात ठेवण्याजोगी आहे असे सांगितले तसेच त्यांनी संपादक गोविंद जोशी यांच्या कार्याची प्रशंसा करतानाच कौतुक केले. प्रतिवर्षी ही दिनदर्शिका प्रकाशित होते आणि ही दिनदर्शिका गोर गरिबांना मोफत मिळेल ह्या साठी ते प्रयत्न करतात.
या वर्षी ही दिनदर्शिका गोरगरिबांना मोफत देण्यात येईल असे सत्याची वाटचालचे संपादक गोविंद जोशी यांनी सांगितले. गोर गरिबांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे संपादक गोविंद जोशी यांचे दिनदर्शिका नक्कीच जनतेच्या पसंतीस पडेल असे मत डॉ. अशोक म्हात्रे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment