आवाज कोकणचा / प्रतिनिधी

 पनवेल

 प्लिसंट इंग्लिश स्कूल सांगडे चा आगळा वेगळा उपक्रम -  सखी मेळाव्याचे आयोजन 



स्वर्गवासी पंढरीनाथ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे प्लिसंट इंग्लिश स्कूल सांगडे तालुका पनवेल येथे महिला पालकांसाठी एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन रायगड भूषण श्री धनंजय खुटले यांनी केले होते. 



विद्यार्थी , शिक्षक व पालक यांच्यात खेळीमेळीचे वातावरण रहावे या करिता या मेळाव्याचे आयोजन केले होते.  

या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे तसेच महिला उत्कर्ष समितीच्या सदस्या डॉ. सुरेखा पाटील यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना डॉ.म्हात्रे यांनी महिला पालक या खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यात सिंहाचा वाटा उचलत असल्याचे म्हटले. एक स्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते त्याच धर्तीवर शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय झाल्यास विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून  त्याच्या शैक्षणिक व बौद्धिक क्षमतेला वाव मिळून सुदृढ व सुसंस्कृत विद्यार्थी घडण्यास वाव मिळतो.



सरस्वती मातेला दीप प्रज्वलन करून व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. तेजल पिंपळे यांनी उत्कृष्टरीत्या केले. 



या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव सौ धनश्री खुटले,  सौ प्रतिज्ञा कडव , प्राचार्य श्री. परशुराम पाटील , उपप्राचार्य सौ उज्वला घरत,  सौ मंगल घरत , सुषमा पाटील,  हर्षा अटकर , कुमारी रूपाली पाटील,  कुमारी प्रज्ञा घरत,  सौ जान्हवी गायकर,  कुमारी श्रुति पाटील , कुमारी सुविधा पाटील,  श्री दीपक कल्हेरे, रायगड भूषण श्री रमेश चोरगे व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपास्थित होता. 



 यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी  रांगोळी स्पर्धा,  संगीत खुर्ची व बकेट बॉल स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्वी करण्यात शाळेच्या शिक्षक वृंदाने मोलाची कामगिरी बजावली.





Comments

Popular posts from this blog