एन.एस.एस चे युवक बनत आहेत देशाचे आधारस्तंभ*-डॉ. विजय कोकणे यांचे प्रतिपादन
आवाज कोकणचा / एकनाथ सांगळे
"जे.एस.एम कॉलेज अलिबाग व जे.एस.एस रायगडच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी जन जागृती उपक्रम
सोमवार दिनांक 5 डिसेंबर2 022 रोजी मानीभुते-अलिबाग या ठिकाणी कौशल्य विकास व स्वच्छता उपक्रम आदिंना प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने जे.एस.एस रायगडच्या माध्यमातून ''जे.एस.एम कॉलेज अलिबाग व जे.एस.एस रायगडच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी जन जागृती उपक्रम''* राबवण्यात आला सदर उपक्रमाप्रसंगी गावकऱ्यांना व एन.एस.एस स्वयंसेवक यांना ह्या प्रसंगी कागदी व कापडी पिशव्या बनवण्याचे मार्गदर्शन मुख्य मार्गदर्शक डॉ. विजय कोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आले '' त्याचबरोबर सहाय्यक प्रशिक्षिका सौ प्रतिक्षा सचिन चव्हाण यांनी उपस्थितांकडून सराव करून घेतला तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. प्रतीक्षा चव्हाण यांनी केले.
संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी , उपाध्यक्ष सौ गीतांजली ओक, संचालक डॉ. विजय कोकणे,जे.एस.एम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंर्तर्गत कार्यक्रम राबवित असतांना या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे. प्रा. डॉ प्रवीण गायकवाड व प्रा. श्वेता पाटील, कर्मचारी सौ प्रतिक्षा चव्हाण (अकाउंट मॅनेजर), हिमांशू भालकर हे कर्मचारी व स्वयंसेवक देखील कार्यक्रम राबवित असतांना उपस्थित होते.
Comments
Post a Comment