सलग पाचव्यांदा रसायनी संघ अपराजित

 सलग पाचव्यांदा रसायनी संघ अपराजित

सलग पाचव्यांदा रसायनी संघ अपराजित

रसायनी/वैभव पाटील

                 नगोठणे येथील रिलायंस टाऊनशीप येथे दरवर्षी प्रमाणे रायगड डॉक्टर्स प्रीमियर लीग 3-4 डिसेम्बर रोजी भरवण्यात आली होती .या स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातून 18 तुल्यबळ संघानी सहभाग घेतला होता .डॉक्टर संजय कुरंगले यांच्या नेतृत्वा खाली खेळणाऱ्या रसायनी लायंस संघाने अंतिम सामन्यामधे महाड संघाला पराभूत करुन सलग पाचव्यांदा जेते पदावर आपले नाव कोरले .अंतिम सामन्यात मँन ऑफ द मैच डॉ जितेंद्र पाटील व माँन ऑफ द सीरीज डॉ नीलेश साळुंखे यांना मिळाला .या स्पर्धे मधे रसायनी संघाकडून डॉ संजय कुरंगले ,डॉ जितेंद्र पाटील ,डॉ रोहित कदम ,डॉ नीलेश सालुंखे ,डॉ मिलिंद भगत ,डॉ प्रशांत जगताप ,डॉ वैभव ,डॉ दिपक ,डॉ राहुल ,डॉ गजानन ,डॉ विलास ,डॉ रामप्रसाद ,डॉ कुणाल ,डॉ प्रतीक ,डॉ राजशेखर ,डॉ अनिल ,डॉ सुयोग डॉ.धीरज जैन यांनी सहभाग घेतला होता .

Comments

Popular posts from this blog