आवाज कोकणचा / नवी मुंबई
पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या वतीने आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आज पनवेल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी कायदे तज्ञ प्राध्यापक डॉ. मृत्युंजय कुमार पांडे यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करत कायदा व पत्रकारिता यांचे नातेसंबंध या विषयावर मार्गदर्शन केले.
या दिनाचे औचित्य साधत समितीच्या सर्व सदस्यांना डॉ. अशोक म्हात्रे यांनी मान्यवरांच्या हस्ते अपघाती विमा पॉलिसीचे वाटप केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मृत्युंजय कुमार पांडे, माननीय श्री दुबेजी प्राचार्य टेक्नॉलॉजी कॉलेज शेडुंग, मुंबई अध्यक्ष राजेंद्र लकेश्री, आवाज कोकणचा वर्तमानपत्राच्या कार्यकारी संपादिका आरती पाटील यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व भगवान गौतम बुद्ध याना वंदन करून करण्यात आली . यानंतर समितीच्या कार्याची ओळख सचिव डॉ. वैभव पाटील व खजिनदार शैलेश ठाकूर यांनी करून दिली.
आवाज कोकणचा या वृत्तपत्राचा द्वितीय वर्धापन दिन व तृतीय वर्षातील प्रथम अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले तर पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांनी गुगल मीटिंग द्वारे आपल्या महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांना स्री रोग व आरोग्यासाठी योग या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी समिती उपाध्यक्ष श्री राम जाधव, मुंबई सदस्य श्री आनंद मुसळे , श्री दत्ता वारजे, पुणे अध्यक्ष श्री गणेश कांबळे, महाराष्ट्र सांघटक डॉन. एन. के. के., रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री सुनील भोईर, पनवेल अध्यक्ष श्री अशोक घरत, उपाध्यक्ष श्री गोविंद जोशी(संपादक सत्याची वाटचाल), उरण तालुका अध्यक्ष श्री सुनील ठाकूर, नवी मुंबई अध्यक्ष श्री निलेश उपाध्याय , सदस्य डॉ. रत्नदीप गवळी, कोकण अध्यक्ष श्री अलंकार भोईर, कोकण सचिव श्री. एकनाथ सांगळे,सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ.रोहित कदम पाटील, खालापूर सदस्य श्री. चंद्रकांत मुंढे, प्रदेश सदस्य श्री दिलीप गायकर, प्रदेश सहसचिव श्री ज्ञानेश्वर कोळी, सदस्य श्री . आदित्य वाघ, पेण तालुका अध्यक्ष श्री अरुण चवरकर, श्री. अरविंद येवले व इतर पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.
या वेळी खालापूर तालुका अध्यक्ष पदी श्री. राजू नायक यांची निवड केल्याची घोषणा करण्यात येऊनका र्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Comments
Post a Comment