आवाज कोकणचा / प्रतिनिधि
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे डॉ.प्रशांत एम. एस . सन्मानित
अमृता आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चित्रदुर्ग चे प्राचार्य माननीय डॉ. प्रशांत एम. एस. यांचा आज पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे आदर्श शिक्षक सन्मान देउन गौरव करण्यात आला.
डॉ. प्रशांत एम. एस. यांच्या कारकीर्दीत येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली असून एकूणच कार्यात खूप प्रगती झाली असून ते विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.
अशा विद्यार्थी प्रिय प्राचार्यांना पत्रकार उत्कर्ष समितीने समिती अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला.
यावेळी समितीचे खजिनदार श्री. शैलेश ठाकूर तसेच कॉलेजचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment