पी. डी.पी. एल.क्रिकेट लीग मध्ये तळोजा वॉरियर्स विजयी तर महिला संघात पनवेल स्ट्रायकर्सने मारली बाजी
*पी. डी.पी. एल.क्रिकेट लीग मध्ये तळोजा वॉरियर्स विजयी तर महिला संघात पनवेल स्ट्रायकर्सने मारली बाजी*
आवाज कोकणचा/आरती पाटील
पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिस असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी सालाबाद प्रमाणे स्पर्धा या इव्हेंटच्या आयोजन करण्यात येत असते.यावेळी स्पर्धा 2023 अतिशय थाटामाटात त्याच्या आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा खास करून आपल्या डॉक्टरांसाठी भरवण्यात येत असतात यामध्ये महिला डॉक्टर साठी बॉक्स क्रिकेट स्पर्धा तसेच पुरुषांसाठी ओपन क्रिकेट स्पर्धा या दोन स्पर्धेच्या आयोजन करण्यात येते यावेळेस महिला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माननीय डॉ.गुने सर, डॉ.जयश्री पाटील लाईफ लाईन हॉस्पिटल डायरेक्टर, माधुरी गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले प्रामुख्याने पाच संघांमध्ये ही स्पर्धा झाली त्याच्यामध्ये पनवेल स्ट्रायकर्स या संघाने बाजी मारली व पनवेल रेंजर्स या संघाकडे उपविजेतेपद राहिले. महिला क्रिकेट संघामध्ये उत्कृष्ट खेळाडू डॉ.रुपाली धनावडे, उत्कृष्ट फलंदाज डॉ.अनघा चव्हाण उत्कृष्ट गोलंदाज डॉ.वैशाली डी के उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉ.सुलक्षणा
पुरुष क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन माननीय महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस डॉक्टर क्रिकेट संघामध्ये दहा संघाने सहभाग घेतला होता प्रत्येक संघांमध्ये स्पर्धा होऊन चार संघ प्राप्त झाले प्रामुख्याने करंजाडे वॉरियर्स खारघर फोनिक्स उलवे युनायटेड तलोजा टायगर्स. स्पर्धा चालू असताना आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, विरुद्ध पक्ष नेते प्रीतम म्हात्रे,डॉ.प्रमोद गांधी सर,डॉ.ययाती गांधी सर, राजेंद्र खारपाटील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली पुरुष क्रिकेट स्पर्धांमध्ये आतातटीच्या सामन्यांमध्ये तलोजा टायगर्स या संघाने प्रथमच विजेते प्राप्त झाले व सलग चार वेळा विजेता संघ खारघर फोनिक्स याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धा 2023 चे बक्षीस वितरण आधार हॉस्पिटलचे डॉ.संतोष पांढरे डॉ.मिलिंद पराडकर तसेच स्पर्श हॉस्पिटलचे रोहित नलावडे हॉस्पिटलचे पेनिसि हॉस्पिटलचे डॉ. सिंग यांच्या हस्ते उत्कृष्ट खेळाडू डॉ. वैभव कोपरकर उत्कृष्ट फलंदाज डॉ.नबिल सुलतान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉ.अभिजीत भोईर उत्कृष्ट गोलंदाज डॉ.ईश्वरदास पाटील देण्यात आली विजेतेपद पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या डॉक्टरांच्या माध्यमातून तलोजा टायगर यांना देण्यात आले.
यावेळेस पनवेल डॉक्टर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.वैभव मोकल डॉ. सागर चौधरी डॉ. रवींद्र राऊत डॉ.सागर ठाकूर डॉ. सुदर्शन मेटकर डॉ. अनघा चव्हाण, डॉ गजेंद्र सिलिमकर, डॉ.सचिन पाटील,डॉ.बहाडकर तसेच कोर कमिटीचे डॉ सुलक्षणा मांडे डॉ. अक्षया ठाकूर डॉ नूतन सीलीमकर वैशाली पाटील डॉ अर्चना चौधरी डॉ इंदिरा चव्हाण डॉ.कांचनमालवी,डॉ.रुपाली धनावडे,डॉ.शीतल सोमवंशी,डॉ. वैष्णवी नाईक,डॉ.आनंदी, डॉ सचिन मोकल डॉ.वैभव पाटील डॉ सुनील मुंबईकर डॉ पुजारी डॉ.विवेक महाजन डॉ.राजेश म्हात्रे डॉ.स्वप्नील लोखंडे.डॉ.योगेश भोंडकर,डॉ.सचिन पोवार डॉ. दिनेश धनावडे. यांनी सर्वांनी फार मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सहभाग घेतला व उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment