आवाज कोकणचा प्रतिनिधी - राकेश देशमुख
नागोठणे : दिनांक २८ जानेवारी २३
डंपर, कंटेनर व ट्रक यांच्या झालेल्या भीषण टकरीत एक चालक गंभीर जखमी...
दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्री. मनोहर माळी यानी दिलेल्या फिर्यादीनुसार संध्याकाळी ठीक 6 वाजताच्या सुमारास मौजे वाकण ब्रीज पासुन कोलाड येथे मुंबई गोवा हायवेवर अतिवेगवाने वाहन चालवलयाने एक भीषण अपघात झाला आहे.
यावेळी डंपर क्र. एमएच 06 बी डब्ल्यू 2184 हा वाकण वरून कोलाड येथे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक जीजे 06 ए एक्स 0371 हा जिंदाल कंपनी येथुन अहमदाबाद येथे जात असताना त्याला एक कंटेनर ट्रक क्रमांक एम.एच 43 बीपी 0615 हा अतिवेगवाने ओव्हर टेक करताना तीन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे .
सदरचा अपघात हा कंटेनर ट्रक क्रमांक एम एच 43 बीपी 0615 वरील चालक यांच्या चुकीमुळे झाला आहे याची माहीती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जगताप यांनी घटनास्थळास भेट देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. पाटील करीत असून जखमीला उपचाराकरीता जवळील एम जी एम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून तेथील परिस्थिती आता शांत आहे.
Comments
Post a Comment