आवाज कोकणचा / प्रतीनिधी

राकेश देशमुख



मुंबई गोवा महामार्गावर दासगांव येथे एका पादचाऱ्याचा चिरडून जागीच मृत्यू...


 मुंबई गोवा महामार्गावर दासगाव च्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर दासगांव येथे एका पादचाऱ्याचा चिरडून जागीच मृत्यू...

 दासगाव कडून वीरच्या दिशेने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने टक्कर दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.स दर व्यक्ती ही वीर- गावामधील सचिन रामभाऊ दासगावकर वय 38 असे आहे. सदर घटनेची माहिती मिळतात पोलीस प्रशासन व अपदा मित्र घटनास्थळी हजर झाले

 सदर मृत व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालय महाड येथे सर्व विच्छेदनासाठी पाठवण्यात आले अज्ञात वाहनाचा तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री पवार करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog