आवाज कोकणचा / मुंबई प्रतिनिधी
सावंत भोसले कुलस्वामिनी पतपेढीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण
सावंत भोसले कुलस्वामिनी पतपेढी ,भांडूप , मुंबई हि २०२२-२०२३ मध्ये आपल्या कारकीर्दीची नाबाद २५ वर्षे पूर्ण करत असल्याने रौप्य महोत्सवी वर्ष सादर करत आहे.त्यानिमित्ताने स्नेहसंमेलन व हळदीकुंकू समारंभ रविवारी दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी यशवंत चांदजी सावंत विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, उत्कर्ष नगर, भांडुप पश्चिम, मुंबई येथे सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.सदर समारंभ प्रसंगी तमाम स्त्री व पुरुषांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्यासाठी सावंत भोसले कुलस्वामिनी पतपेढी मार्फत आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment