आवाज कोकणचा / प्रतिनीधी

पनवेल 


*श्रीमती बारकुबाई नामदेव पाटील एज्युकेशन सोसायटी चे प्रेयश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

*श्रीमती. बारकुबाई नामदेव  पाटील एज्युकेशन आणि रिसर्च सोसायटीचे प्रयेश मराठी व इंग्रजी माध्यम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज  रोडपाली कळंबोली  येथे दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संस्थापक - मा.श्री. आत्माराम नामदेव पाटील, उपाध्यक्ष -  पांडुरंग नामदेव पाटील, कार्याध्यक्ष - कु. विना आत्माराम पाटील, मुख्याध्यापिका - सौ. सारिका शिवराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  वार्षिक स्नेहसंमेलना मध्ये  अंकुर या नावाने कार्यक्रमाचे आयोजन करून " बीज अंकुरते ओल्या मातीने वास्तुचे विद्यालय होते, मुलांच्या साथीने बीजरूप  अंकुरातून वेली वृक्ष घडतात. बालरूपी अंकुराने शाळा फुलतात "  असे छान प्रकारचे उच्चारण केले होते. यामध्ये शाळेच्या बाल- कलाकारांनी विविध प्रकारचे नृत्य, गायन, नाटक, हास्य कथा, तसेच अनेक प्रकारचे मनोरंजन करून रसिकांची मने जिंकली. शाळेच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्यामुळे. ह्या कार्यक्रमाला खुप रंगत आली.कार्यक्रमासाठी पालक वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. महादेव नामदेव पाटील. तसेच प्रमुख पाहुणे मा.श्री. सिताराम मोहिते  साहेब,( गटशिक्षणाधिकारी) पंचायत समिती पनवेल शिक्षण विभाग, मा.श्री. संजय पाटील साहेब( वरिष्ठ पोलिस निरीक्षक) दिनेश पाटील साहेब ( सहाय्यक पोलीस निरीक्षक )व विशेष अतिथी म्हणून  मा. श्रीमती प्रतिमा वसंत म्हात्रे ( वरिष्ठ लिपिक ) पंचायत समिती पनवेल शिक्षण विभाग या सर्वांची विशेष उपस्थिती होती.  तसेच पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष व  आवाज कोकणचे उपसंपादक डॉ. अशोक म्हात्रे,  पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव व आवाज कोकणचे  संपादक डॉ.वैभव पाटील तसेच पत्रकार उत्कर्ष समिती खजिनदार व आवाज कोकणचा चे प्रतिनिधी पत्रकार म्हणून शैलेश सिताराम ठाकुर उपस्थित होते.**

Comments

Popular posts from this blog