आवाज कोकणचा / प्रतिनीधी
छत्रपती शिवाजी महाराज संस्थेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत "फ्रेशर्स पार्टी आणि कार्यक्रमाचे आयोजन
वस्त्र
छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी संस्थे मध्ये प्रथम वर्षामध्ये प्रवेश केलेल्या व इतर विद्यार्थ्यांसाठी Fresher's Party आणि SPECTRA कार्यक्रमाचे दिनांक २३ जानेवारी रोजी आयोजन संस्थेचे प्राचार्य डॉ धर्मेंद्र दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सेंट विल्फ्रेड सोसायटीचे सचिव डॉ. केशव बढाया यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक गणासोबत हितगुज केले. कार्यक्रमासाठी विशेष पाहूणे म्हणून पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, सचिव डॉ वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोईर उपस्थित होते.
"सुर नवा ध्यास नवा" ह्या मालिकेची विजेता" गायिका श्वेता ठाकूर हिने चंद्रा ह्या गाण्याचे सादरीकरण करून युवा वर्गाने ठेका धरत जल्लोष केला. तसेच महाराष्ट्राची प्रसिद्ध अष्टपैलू नृत्यांगना सुप्रिया वालनकर यांनी आपल्या विशेष अदानी उपस्थितांची मने जिंकली.
सुप्रसिध्द गायक, संगीतकार हरिदास सुरडकर, विश्ननाथ गायकवाड आणि अशोक कवडे यांनी वेगवेगळी गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाला सि एस एम यू चे रजिस्ट्रार डॉ. आर. पी. शर्मा, आणि सेंट विल्फ्रेड सोसायटीचे सर्व विभागाचे प्रमुख डॉ मृत्युंजय पांडे, डॉ. अनिरुद्ध ऋषी, डॉ. दीनानाथ झाडे आणि श्री. साजू चेरियन , एच. आर. इस्थर मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष सहयोग ज्यांनी दिला असे श्री राम कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख श्री राम रेड्डी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र दुबे ह्यांनी केले.विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत आणि फॅशन शोचे सादरीकरण केले. मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर चा किताब प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विद्यार्थि ऐश्वर्या त्रिपाठी आणि साहिल ह्यांनी पटकावला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख महेश जाधव, प्राध्यापक श्वेता उमाळे , स्वाती मोरे आणि अनुप मौर्य, प्राध्यापक श्रध्दा कावळे, हरिश्चंद्र मौर्य, कालिदास ,नूतन काळे, प्रतीक्षा नगोलकर, वंदना राय, स्नेहल रासकर,प्रवीण मंडल, ईश्वर , प्रवीण भोजने, वैशाली, तेजस्विनी , पूर्वा , रेश्मा ह्यांनी विशेष नियोजन केले.
Comments
Post a Comment