आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधी
एम. ई.एस. पब्लिक स्कूल कळंबोली येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण व पोक्सा कायदा याविषयी शिबिराचे आयोजन
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी जोशी मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी शिक्षक सौ. केशर जाधव ,श्री. भास्कर भाविक, श्री. रमेश पाटील सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक दिलीप गुजर साहेब, उप. पोलीस निरीक्षक सुशांत दुडे साहेब, कळंबोली.तसेच इंडियन मार्शल आर्ट्स शितो - रियो फेडरेशनचे उपाध्यक्ष, 4th डॅन ब्लॅक बेल्ट,राष्ट्रीय पंच व पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र खजिनदार शैलेश ठाकूर, 2nd डॅन ब्लॅक बेल्ट, राष्ट्रीय पंच, नॅशनल मेडलिस्ट सानिका ठाकूर यांची उपस्थिती होती.
शाळेच्या शिक्षक वृंदा करून आलेल्या पाहुण्यांचा आपल्या संस्कृतीचा पावित्र राखणार तुळशीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. गुजर साहेब व दुडे साहेब यांनी बाळ अत्याचाराविषयी निघालेल्या पोक्सा कायद्या संबंधित विशेष माहिती देऊन मुलांना जागृत केले. व जर कोणावर अन्याय होत असेल तर त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच शैलेश ठाकूर, व सानिका ठाकूर यांनी जर आपल्यावर अतिप्रसंग आला तर त्याच्यापासून आपण बचाव कसा करू शकतो ह्या विषयी खुप चांगल्या प्रकारे माहिती देऊन त्याप्रमाणे प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे शाळेकडून आभार मानण्यात आले.
Comments
Post a Comment