आवाज कोकणचा / उरण
उरण (पूजा चव्हाण ) :
उरण पोलीस ठाण्यात हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
१४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस आणि अश्या गोड दिवशी उरण पोलीस ठाण्यात आपल्या उरण तालुक्यातील सर्व महीला भगिनी साठी सौभाग्याचे लेने म्हणजे हळदीकुंकू आणि या हळदीकुंकू समारंभाचे नियोजन बद्द कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. भावनताई घाणेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश) यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमास गोड अशी सुरवात करण्यात आली .
उरण महिला पोलीस पी. एस .पोउपनि पदमजा पाटील, मपोहवा १९० रचना ठाकूर, मपोहवा १३९३ प्रदेवी पाटील, मपोना २५८१ प्रिती म्हात्रे, मपोशी प्रियंका पाटील, मपोशी ३६६० सुरेखा राठोड, मपोशी ३७४९ वैशाली पाटील, सागरी सुरक्षा शाखा नवी मुंबई शुभांगी पाटील,या सर्व महीला पोलीस भगिनी यांनी आलेल्या सर्व महिला भगिनींना हळदीकुंकू वहाण देऊन पुजन केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिला भगिनीचे महिला संक्षमिकरण विषयी भाषणे करण्यात आली होती . त्या भाषणात आज उरण पोलीस ठाणे हद्दीत एका लहान पाच वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला.त्यामुळे संपूर्ण दिवसभर भावना ताई त्या लहानग्या चिमुकलीला घेऊन उरण पोलीस स्टेशन मध्ये न्यायासाठी त्या जातीने हजर राहून त्या नराधमाने केलेल्या दुशकुत्याची सजा उरण वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा. सुनील पाटील साहेबांन कडे तक्रार करुन त्या नराधमाला जेर बंद केले हे उदाहरण देऊन महिलांनी स्वतःसाठी सक्षम व्हायला पाहिजे असे सांगण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवीण्या साठीसौ भावना ताई घाणेकर, उपस्थित राहील्या .उरण पोलीस ठाण्यात आयोजित हळदीकुंकू हा कार्यक्रम महिलांनसाठी दरवर्षी आनंददायी, स्मरनिय पर्वणीच असतो.
या कार्यक्रमात महिला पोलीसांनी हळदीकुंकू हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला त्यानंतर संगीत खुर्ची खेळ बलुन खेळ , असे वेगवेगल्या प्रकारचे खेळ यावेळी घेण्यात आले. अशा रंगतदार कार्यक्रमात गायक देवेंद्र पाटील, वृषाली पाटील यांनी गायण केले. छान प्रिती भोजन होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित मा. सुनील पाटील(वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण), सौ भावना ताई घाणेकर(राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश), सौ. सायली म्हात्रे(मा.नगराध्यक्षा उरण), सौ सीमा घरत(शेकाप तालुका अध्यक्षा)विमल पाटील, नायदा ठाकुर, आफशा मुकरी , कुसुम ठाकूर, लीना पाटील, वर्षा म्हात्रे, दिपाली पाटील, लता पाटील, रुपाली खाडे, अरुणा घरत रेणुका पाटील, वंदना कोळी, उरण पोलीस ठाण्यातील सर्व महिला पोलीस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment