आवाज कोकणचा / प्रतिनीधी उरण
महिला उत्कर्ष समिती रायगड अध्यक्षा रेखा घरत यांनी महिलेला दिला मदतीचा हात
उरण शहरातील एक परप्रांतीय महिला व तिच्या नवऱ्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून वारंवार भांडणे होऊन प्रकरण विपर्यास गेले होते.
याबाबतची माहिती पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष रेखा घरत व पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका अध्यक्ष पूजा चव्हाण यांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने त्या महिलेला मदतीचा हात देऊन पोलीस पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधून सदर महिलेस व तिच्या नवऱ्यास एकत्र बसवून त्या दोघांचे समुपदेशन केले .
तसेच भविष्यात नवऱ्याकडून मारहाण किंवा शिवीगाळ होणार नाही याबाबत हमी घेतली.
यावेळी महिला उत्कर्ष समिती उरण तालुका अध्यक्ष निर्मला पाटील यांनीही सहकार्य केले.
Comments
Post a Comment