आवाज कोकणचा / प्रतिनीधी
बबन जोशी यांच्या कडू साखर या शॉर्ट फिल्म ला बेस्ट शॉर्ट फिल्म तर बबन जोशी यांना बेस्ट डायरेक्टर पुरस्कार
अनमोल चित्र प्रोडक्शन प्रस्तुत सुनिता ओशिवळेकर व मधुरा अनमोलराजे निर्मिती असलेली मराठी शॉर्ट फिल्म *कडू साखर* हि एक अर्ध सत्य घटनेवर आधारित वास्तववादी शॉर्ट फिल्म आहे. आर्थिक संकटांवर मात करून या शॉर्ट फिल्म ची निर्मिती केली आहे. बाप आणि एकुलती एक मुलगी हि पात्रे केंद्र स्थानी ठेवून बबन जोशी यांनी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे. बबन जोशी हेच दिग्दर्शक असून मुख्य भुमिका त्यांनीच साकारली आहे. सोबत सुनील जाधव, जॉनी कदम, सुधाकर वसईकर, आबा पेडणेकर, रश्मी लुकतुके,वंदना गानू, अर्चना डोळस, ऐश्वर्या मोहिते,नरेश कांबळे, अमोल पाटील, अश्विनी पगारे,लता गणता, सुनिता ओशिवळेकर, त्रिशा पवार, अभिजित कोंडकर, श्रीकृष्ण कदम, संदीप जाधव,रोहन पडवणकर, प्रदीप म्हात्रे, पुंडलिक वाडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अमित स्वामी यांनी पार्श्वसंगीत व पुनर्ध्वनी केले आहे. कार्तिक दमानी यांच्या स्टुडिओ मध्ये एडिटिंग चे काम झाले.तर
वृषकेत वाडेकर हे डिओपी आहेत. तर सीसी, सबटायटल धीरज टकले यांनी केले. अन्नू जोशी यांनी कलादिग्दर्शक आहे. कार्यकारी निर्माता अनमोल राजे हे असून. अभिनेता मकरंद पाध्ये व मयुर कांबळे,बंदीश अवेरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.तर संध्या पाटणकर, सविता सोलंकी, सुधाकर वसईकर, बाळाराम जाधव, दिनेश जाधव , अविनाश अनसुरकर यांनी आर्थिक मदत दिली.
. नुकताच या फिल्म करीता बबन जोशी यांना बेस्ट डिरेक्टर तर औरंगाबादमध्ये या फिल्म करीता बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. लवकरच ही शॉर्ट फिल्म अनमोल चित्र प्रोडक्शन या यु ट्युब वर रिलीज होणार आहे.
Comments
Post a Comment