आवाज कोकणचा / प्रतिनीधी
पनवेल येथील न्यू इंग्लिश शाळेत १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोपा समारोप
पनवेल : दि. २७. पनवेल येथील सुकापुर न्यू इंग्लिश शाळेतील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला होता.यावेळी दहावीच्या सर्व तुकड्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. या समारंभाचे आयोजन ९ वीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.
या कर्यक्रमची प्रस्थावना करून तसेच कर्यक्रमची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता ९ वीच्या विध्यार्थायनी १० विच्या विध्यार्थायनी भेट वस्तू व पुष्प देऊन सन्मान केला.
यावेळी अनेक विध्यार्थी व शिक्षकांना आपले भाषण करताना अश्रू आवरता आले नाही. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक बोलताना कोठेही त्यांची कडक शिस्त कुठे दिसून येत नव्हती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या.
या निरोप समारंभस प्रमुख पाहुणे संजय पाटील, पत्रकार उत्कर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, डॉ. सुनील देशपांडे, धनंजय देशपांडे, शशिकला सिंग, सुदिन वाटावे, अपर्णा पाटील, नीलकंठ पाटील, रीना बिजू व सारिका नगराने उपस्थित होते.
Comments
Post a Comment