आवाज कोकणचा / प्रतीनिधी

कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू

कॉन्ट्रॅक्टर विलास उसाटकरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मानवी हक्क संरक्षण फेडरेशनची मागणी 

पनवेल,प्रतिनीधी:- श्री.चिन्मय गौरांग बिल्डिंग,उरण नाका, पनवेल येथे बिल्डिंगच्या कलरचे काम करत असताना वरून पडुन एका कामगाराचा मृत्यु झाला असून त्याला कॉन्ट्रॅक्टर संपुर्ण पणे जबाबदार असून त्याच्यावर मनुष्य वधाचा गून्हा दाखल करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ श्रेयस ठाकूर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्री, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कडे केली असून पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सुद्धा पत्र दिले आहे.श्री.चिन्मय गौरांग बिल्डिंग,उरण नाका, पनवेल येथेकॉ न्ट्रॅक्टर विलास उसाटकर याच्या मार्फत बिल्डिंगच्या कलरचे काम सुरु होते.त्यावेळी कामगार कोणतीही सेफ्टी न वापरता कलरचे काम करत आहेत. कॉन्ट्रॅक्टर विलास उसाटकर यांना तांबोळी यांनी बोलावून याबाबत विचारणा केली व सेफ्टी बेल्ट,हेल्मेट व इतर साहित्य कामगारांना देऊन काम करावे असे सांगितले. पण त्याने याकडे दुर्लक्ष करत कोणतीही सेफ्टी न वापरता कलरचे काम सुरु ठेवले.



सदर बिल्डिगंला बाहेरील बाजूस बिल्डिगला बांधलेल्या बांबूचे परांचीवरती 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजताचे सुमारास एक कामगार 6 व्या मजल्यावरील बाल्कनीचे भिंतीला बाहेरील बाजूस कलर करीत असतांना अचानकपणे त्याचा तोल जावून पाय घसरुन तो खाली रस्त्यावर पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस ठाण्यात या मृत्यूची अकस्मात मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे. कॉन्ट्रॅक्टर विलास उसाटकर याच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाला असून याला सर्वस्वी कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे. जर सेफ्टी साधनांचा वापर केला असत तर कामगाराचा मृत्त्यू झाला नसता. मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने कॉन्ट्रॅक्टर विलास उसाटकर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पनवेल शहर पोलीस पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

कोट

सेफ्टी साहित्य कामगारांना देऊन जर काम केले असते तर आज एका कामगाराचा मृत्यु झाला नसता.कॉन्ट्रॅक्टर विलास उसाटकर याला आम्ही याबाबत सांगितले होते.त्यानी याकडे दुर्लक्ष करत हलगर्जीपणा केला.आणि एका कामगाराचा नाहक बळी गेला..त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही पत्र दिले आहे

Comments

Popular posts from this blog