आवाज कोकणचा प्रतिनीधी

जगदिश क्षीरसागर 


 महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवमुद्रा प्रतिष्ठान सुकापुर यांच्या वतीने शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.*

संपर्क: ९८२०४५७४८०



पनवेल १८८ (रायगड) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवमुद्रा प्रतिष्ठान सुकापुर नवीन पनवेल यांच्या वतीने शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिवजयंती निमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले होते. 



सकाळी ९:३० वाजता अभिषेक सोहळा व शिवपूजन व १०:३० ते ३:०० वाजेपर्यंत पोस्ट ऑफिसचा अपघाती विमा ३९९ रूपये प्रति वर्ष भरुन १० लाख अपघात विमा; आणि संध्याकाळी ७:३० ते १०:३० वाजेपर्यंत कैःनवनाथ चांगदेव ठाकूर सुकापुर यांच्या स्मरणार्थ अन्नदान वाटप केले. या कार्यक्रमास पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे कोकण उपाध्यक्ष श्री लालचंद यादव यांनी या कार्यक्रमास भेट देऊन श्री शिवछत्रपतींनाा अभिवादन केले .



 
वकील संघटनेचे अध्यक्ष ऑड. मनोज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवजयंती उत्सवाचे आयोजक मनसे विभागीय अध्यक्ष राज क्षिरसागर सुकापुर, मनसे मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष किरण गावडे, सुकापुर शाखा अध्यक्ष जयवंत बाबरे, मनसे सेक्रेटरी विक्रम चव्हाण, सुकापुर शाखा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, मनसे खजिनदार योगेश जगताप, तसेच मनसे सैनिक सुमित कदम , स्वप्निल सोनवणे,किसन नाईक विलास देसाई, तसेच लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळा फडके आदी. मान्यवर उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog